दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:33 IST2025-11-24T13:33:09+5:302025-11-24T13:33:40+5:30

ATC ने विमानाला रनवे २९ एलवर उतरण्याची स्पष्ट परवानगी दिली होती, पण वैमानिकाने ते विमान उड्डाणासाठी वापरल्या जाणाऱ्या रनवे २९ आरवर उतरवले.

Major accident averted at Delhi airport; Afghan plane lands on runway, pilot says... | दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो...

दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो...

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल (२४ नोव्हेंबर) एका मोठ्या अपघाताची शक्यता थोडक्यात टळली आहे. काबूलहून आलेल्या एरियाना अफगाण एअरलाईन्सच्या एका विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी मिळालेल्या रनवेऐवजी दुसऱ्याच रनवेवर लँडिंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ATC ने विमानाला रनवे २९ एलवर उतरण्याची स्पष्ट परवानगी दिली होती, पण वैमानिकाने ते विमान उड्डाणासाठी वापरल्या जाणाऱ्या रनवे २९ आरवर उतरवले. सुदैवाने, त्यावेळी २९ आरवर कोणतेही विमान उड्डाणासाठी सज्ज नव्हते, त्यामुळे लँडिंग सुरक्षित झाले आणि मोठी दुर्घटना टळली.

या चुकीबद्दल वैमानिकाने आपली चूक मान्य करण्याऐवजी खराब हवामान आणि 'ILS सिस्टिम'ला दोष दिला आहे. वैमानिक दिशाभ्रमित झाला होता की तांत्रिक त्रुटी आली होती, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title : दिल्ली एयरपोर्ट पर बड़ा हादसा टला; अफगान विमान गलत रनवे पर उतरा।

Web Summary : दिल्ली एयरपोर्ट पर एक बड़ा हादसा टल गया जब अफगान एयरलाइंस का एक विमान गलत रनवे पर उतरा। पायलट ने खराब मौसम और आईएलएस सिस्टम को दोषी ठहराया। डीजीसीए ने घटना की जांच के आदेश दिए हैं।

Web Title : Major mishap averted at Delhi airport; Afghan plane lands on wrong runway.

Web Summary : A major accident was narrowly avoided at Delhi Airport when an Afghan Airlines plane landed on the wrong runway. The pilot blamed poor weather and the ILS system. DGCA has ordered an investigation into the incident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.