ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा चोरीला! चोरट्यांनी कटरने कापून नेला ब्राँझचा पुतळा; भारतीयांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:36 IST2026-02-03T15:35:37+5:302026-02-03T15:36:26+5:30

मेलबर्न शहरात महात्मा गांधींचा ब्राँझचा पुतळा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

Mahatma Gandhi Statue Stolen in Melbourne Thieves Use Angle Grinder to Cut Bronze Icon in Rowville | ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा चोरीला! चोरट्यांनी कटरने कापून नेला ब्राँझचा पुतळा; भारतीयांमध्ये संताप

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा चोरीला! चोरट्यांनी कटरने कापून नेला ब्राँझचा पुतळा; भारतीयांमध्ये संताप

Mahatma Gandhi Statue: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात असलेल्या ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमधून महात्मा गांधींचा ब्राँझचा पुतळा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी चक्क अँगल ग्राइंडर वापरून पुतळा कापून चोरून नेला. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

व्हिक्टोरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:५० च्या सुमारास रोविल येथील किंग्जले क्लोज परिसरात ही चोरी झाली. तीन अज्ञात आरोपींनी या चॅरिटी संस्थेच्या परिसरात प्रवेश केला आणि पुतळा कापून नेला. या घटनेची चौकशी नॉक्स क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिट करत आहे.

पुतळ्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व

हा पुतळा भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सतर्फे भेट देण्यात आला होता. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते. हा पुतळा भारतीय समुदायासाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रेरणेचे प्रतीक मानला जातो.

भंगार विक्रेत्यांना पोलिसांचा इशारा

हा पुतळा ब्राँझचा असल्याने चोरटे तो धातू म्हणून विकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सर्व भंगार विक्रेत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जर कोणी अशा प्रकारचा पुतळा किंवा त्याचे तुकडे विकायला आले तर तातडीने पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पूर्वीही झाला होता विद्रुपीकरणाचा प्रयत्न

२०२१ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत अज्ञात व्यक्तींनी या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यावेळी या घटनेचे पडसाद भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांत उमटले होते. यापूर्वी अनेक देशांत खलिस्तानी समर्थकांनी गांधीजींच्या पुतळ्यांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरीमागेही काही विशिष्ट विचारसरणीचा हात आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

राजकीय स्तरावरून निषेध

व्हिक्टोरियाचे विरोधी पक्षनेते इव्हान मुलहोलँड यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक असून यामुळे समुदायातील सुरक्षिततेच्या भावनेला धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title : ऑस्ट्रेलिया में महात्मा गांधी की प्रतिमा चोरी; भारतीयों में आक्रोश

Web Summary : मेलबर्न में एक ऑस्ट्रेलियाई भारतीय समुदाय केंद्र से महात्मा गांधी की कांस्य प्रतिमा चोरी हो गई। चोरों ने ग्राइंडर से काटकर प्रतिमा चुराई, जिससे भारतीय समुदाय में आक्रोश है। पुलिस जांच कर रही है, उन्हें पिछली तोड़फोड़ और खालिस्तानी समर्थकों द्वारा गांधी प्रतिमाओं को निशाना बनाने के कारण घृणा अपराध का संदेह है।

Web Title : Mahatma Gandhi Statue Stolen in Australia; Outrage Among Indians

Web Summary : Mahatma Gandhi's bronze statue was stolen from an Australian Indian community center in Melbourne. Thieves used a grinder to cut and steal the statue, sparking outrage among the Indian community. Police are investigating, suspecting a possible hate crime due to past vandalism incidents and Khalistani targeting of Gandhi statues.