'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:51 IST2025-08-19T11:50:22+5:302025-08-19T11:51:00+5:30
London Clash: या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
London Clash: नुकताच भारताने आपला 79वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मात्र, या स्वांतंत्र्यदिनी लंडनमध्येभारत आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लंडनच्या रस्त्यावर भारताचा तिरंगा झेंडा घेऊन आलेल्या भारतीय तरुणींशी पाकिस्तानी नागरिकांनी असभ्य वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
⚡ UK: Pakistani goons harass Indian Muslim girls on the streets of London during India's Independence Day celebrations pic.twitter.com/QDDxArDinQ
— OSINT Updates (@OsintUpdates) August 18, 2025
या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी तरुण त्यांचा झेंडा फडकवाताना आणि भारतीय तरुणी तिरंगा फडकवताना दिसत आहेत. यावेळी पाकिस्तानी तरुणांनी भारतीय तरुणींच्या हातून तिरंगा ध्वज हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र, या भारतीय तरुणींना पाकिस्तानींना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परतून लावले. यावेळी त्यांनी मोठमोठ्याने हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या. पाकिस्तानी तरुणांचा मोठ्या धाडसाने सामना केल्याबद्दल सोशल मीडिया युजर्स त्या तरुणींचे कौतुक करत आहेत.
लंडनच्या रस्त्यांवर सतत चकमकी
दरम्यान, लंडनच्या रस्त्यांवर भारत आणि पाकिस्तानींमध्ये चकमकी होणे काही नवीन नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान, लंडनच्या रस्त्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये अनेकदा बाचाबाची झाल्याचे दिसून आले आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांनी आपापल्या सरकारच्या समर्थनार्थ लंडनच्या रस्त्यांवर निदर्शने केली, ज्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती.