शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Lion Air flight : विमान फक्त दोन महिनेच जुने आणि भारतीय पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 12:34 IST

इंडोनेशियाच्या जकार्ताहून पांकल पिनांग शहराकडे जात असलेले लायन एअरचे विमान आज समुद्रात कोसळले. दुर्घटनेनंतर मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

जकार्ता : इंडोनेशियाच्या जकार्ताहून पांकल पिनांग शहराकडे जात असलेले लायन एअरचे विमान आज समुद्रात कोसळले. या विमानातून 189 जण प्रवास करत होते. यामध्ये 181 प्रवासी, दोन पायलट आणि सहा विमान कंपनीचे कर्मचारी होते. दुर्घटनेनंतर मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

विमानाने सोमवारी सकाळी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलटने माघारी परतण्याची विनंती केली होती. मात्र, परवानगी मिळाल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानामध्ये इंडोनेशियाचे अर्थखात्याचे 20 अधिकारीही प्रवास करत होते. तसेच विमानातील दोन पायलटपैकी एक पायलट भारतीय होता. कॅप्टन भव्य सुनेजा असे या पायलटचे नाव होते. ते दिल्लीचे रहिवासी आहेत. मार्च 2011 मध्ये त्यांनी लायन एअरमध्ये नोकरी स्वीकारली होती. विमानाचा संपर्क तुटल्याच्या ठिकाणापासून 3.7 किमी दूरवर कारावांग खाडीमध्ये विमान कोसळले. 

विमानाचा मलबा सापडला असून नौदलाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ही विमान दुर्घटना इंडोनेशियाची आजवरची सर्वात मोठी आहे. याआधी 2014 मध्ये  एयर एशियाचे विमान क्यूझेड 8501 दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामद्ये 162 लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान बोइंग 737 मैक्स-8  होते. 

संपर्क तुटण्याआधी 5 हजार फुटांच्या उंचीवरफ्लाईटरडारच्या माहितीनुसार लायनचे जेटी-610 या विमानाने सकाळी 6.20 वाजता उड्डाण केले. यानंतर 13 मिनिटांनी समुद्रावर हे  विमान गायब झाले. तेव्हा हे विमान 5 हजार फुटांच्या उंचीवर होते. मात्र, काही वेळातच हे विमान खाली येऊ लागले. संपर्क तुटला तेव्हा हे विमान 3650 फुटांच्या उंचीवर होते. 

दोन महिन्य़ांपूर्वीच विमानाची खरेदीबोईंग कंपनीच्या या 737 मॅक्स-8 विमानाचा हा पहिलाच अपघात होता. 2016 पर्यंत हे मॉडेल केवळ व्यावसायिक वापरासाठीच होते. मात्र, यंदाच्या ऑगस्टमध्ये हे नवे विमान लायन एअरला विकण्यात आले. विमान उडविणारे पायलटही अनुभवी होते. दोघांनाही एकूण 11 हजार तास विमानउड्डाणाचा अनुभव होता.  

टॅग्स :airplaneविमानIndonesiaइंडोनेशियाAccidentअपघात