शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

#LetHerWork

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 9:40 AM

कामाच्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून ब्राझिलमधील महिला पत्रकार ब्रूना डेल्ट्रीनं एक मोहीम सुरू केली.

- कलीम अजीम

ब्राझिलमध्ये महिला पत्रकारांना फिल्ड रिपोर्टिंगच्या वेळी लैंगिक छळाला सामोरं जावं लागत आहे. या ‘लैंगिक अत्याचारा’ला महिलांनी सोशल मीडियातून '#LetHerwork'' हे हॅशटॅग वापरून वाचा फोडलीय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीचे धक्कादायक व्हिडीओ फुटेज या पत्रकारांनी इंटरनेटवरून प्रसारित केलं. फिल्डवर काम करतेवेळी नाजूक अवयवांना स्पर्श करणारे असंख्य हात या व्हिडीओतून दिसतात, एवढंच नव्हे तर काहींनी आॅन एअर असताना महिला पत्रकारांवर थेट लैंगिक हल्लेदेखील केले आहेत, ही किळस येणारी दृश्यं ट्विटरवर लाखोंच्या संख्येनं रि-ट्विट केली जात आहेत. या व्हिडीओ क्लीपवरून ब्राझिलच्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली.अ‍ॅथलिट खेळात ब्राझिलचं नाव अव्वल स्थानी मानलं जातं, जगभरातील फुटबॉलप्रेमी दर्शक खेळाचा आनंद घेण्यासाठी ब्राझिलला कूच करतात. पण, खेळाच्या या स्वप्ननगरीवर अलीकडे दहशतीचं सावट पसरलं आहे. खेळ बघायला आलेले दर्शक खेळ, भावना विसरून मीडियाकर्मींवर हल्ले करत आहेत. यासंदर्भात बीबीसीनं २८ मार्चला ‘रेग्युलर बुलेटिन’मध्ये एक धक्कादायक स्टोरी प्रसारित केली. ब्राझिलमधील न्यूज चॅनलमध्ये काम करणा-या, क्रीडा पत्रकार असणाºया काही मुलींच्या भयानक कथा बीबीसीनं प्रसारित केल्या. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशी दृश्यं सेन्सॉरच्या कात्रीविना झळकली. जगविख्यात ‘रिओ दी जेनेरिओ’च्या स्पोर्ट्स स्टेडिअममधील या व्हिडीओ कटिंग्ज होत्या.

२७ आणि २८ मार्च रोजी, दी गार्डियन, दी एक्स्प्रेस ट्रीब्यून, दी डेली डॉट, बीबीसीसारख्या जगभरातील सर्व प्रतिष्ठित मीडिया संस्थांनी ही बातमी प्रामुख्यानं प्रकाशित केली होती, तर भारतात बिझनेस स्टॅण्डर्ड या वृत्तपत्रानं पहिल्या पानावर या बातमीला जागा दिली होती. दी गार्डियनच्या वृत्तानुसार एखाद्या खेळाडूचा खेळ वाईट होत असेल आणि दुसरा चांगला खेळत असेल तर स्टेडिअममधील दर्शक स्पोर्ट्स रिपोर्टर्सवर हा राग काढतात. बूम भरलेल्या महिला पत्रकाराशी सलगी केली जाते. काहीजण तर त्यांच्या शरीराला स्पर्श करतात. ब्राझिलच्या अनेक स्टेडिअममध्ये अशा घटना घडत असल्याचं पीडित ‘ब्रूना डेल्ट्री’ हिनं म्हटलं आहे. २८ मार्चला लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये तिनं यासंदर्भात धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘फिल्डशिवाय अन्यत्रही आमच्याकडे बघणा-यांच्या नजरा किळसवाण्या असतात!’ ब्रूनासारख्या अनेक महिला पत्रकारांनी ट्विटरवरून आपले धक्कादायक अनुभव मांडले आहेत.

वारंवार होणा-या लैंगिक छळाला कंटाळून ब्रूना डेल्ट्रीनं ही मोहीम सुरू केली आहे. #DeixaElaTrabalhar  म्हणजे #LetHerwork ‘ (तिला काम करू द्या) म्हणत तिनं आपल्यासोबत झालेल्या विनयभंगाच्या घटना एकापाठोपाठ मांडल्या. यानंतर अनेक महिला सहकाºयांनी तिला पाठिंबा देत या मोहिमेत सहभाग घेतला. तब्बल ५२ महिला पत्रकारांनी एकत्र येऊन या सार्वज़निक ठिकाणच्या छेडछाडीचे व्हिडीओ तयार करून ‘रिओ दी जेनेरिओ’ स्टेडिअममध्ये मोठ्या स्क्र ीनवर दाखवले, यानंतरही विनयभंगाच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे ब्रूना आणि तिच्या सहकाºयांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली.

फिल्डव्यतिरिक्त इतर ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक छळ यातून पुढे आले आहेत. बीबीसीनं अशा काही महिला पत्रकारांच्या प्रतिक्रिया बुलेटिनमध्ये दाखवल्या होत्या. एका प्रतिक्रियेत ‘ईएसपीएन’ या क्रीडा वाहिनीची एक महिला वार्ताहर लैंगिक भेदभावाबद्दल बोलताना म्हणाली, ‘आम्ही एखादी एक्स्क्लुसिव्ह बातमी आणली की पुरुष सहकारी चारित्र्यावर शिंतोडे उडवत गॉसिप्स पसरवतात, बदनामी करतात. आमचं एकच म्हणणं आहे की, महिलांना ‘सन्मान’ द्या आणि ‘आम्हाला काम करू द्या!’ जगभरात ‘मीटूची’ मोहीम शिखरावर असताना उशिरा का होईना महिला पत्रकारांनीदेखील आपल्या लैंगिक छळाची तक्रार मांडण्यास सुरुवात केली आहे.मार्च महिन्यात भारतात एकापाठोपाठ तीन पत्रकारांच्या हत्या झाल्या, या घटनांवर संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली. मीडिया विश्लेषण करणा-या ‘दी हूट’ या वेबसाइटच्या मते गेल्या तीन वर्षांत भारतात २०० पेक्षा जास्त पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.जगभरात पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इराक, सिरिया, अफगाण आणि आयसिसच्या हल्ल्यांत अनेक पत्रकारांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदे करण्याची मागणी होऊ लागली आहे. अशावेळी ब्राझिलच्या महिला पत्रकारांनी सन्मानासाठी सुरू केलेला लढा हा मैलाचा दगड ठरू शकतो.(लेखक मुक्तपत्रकार आहेत. kalimazim2@gmail.com )

 

टॅग्स :Journalistपत्रकार