lakshmi niwas mittal gant 3.5 million pound to oxford university | कोरोना व्हॅक्सीनसाठी 'या' भारतीय उद्योगपतीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला दिले 3300 कोटी रुपयांचे अनुदान, म्हणाले...

कोरोना व्हॅक्सीनसाठी 'या' भारतीय उद्योगपतीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला दिले 3300 कोटी रुपयांचे अनुदान, म्हणाले...

ठळक मुद्देजेनर इंस्टिट्यूटची स्थापना 2005मध्ये ऑक्सफर्ड आणि यूके इंस्टिट्यूट फॉर अॅनिमल हेल्थ सोबत पार्टनरशिपमध्ये करण्यात आली होती.मित्तल परिवाराने हे अनुदान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सीनॉलॉजी विभागाला दिले आहे.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल सुरू आहे.

नवी दिल्ली - स्टील टॉयकून लक्ष्मी निवास मित्तल यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना व्हॅक्सीनसाठी 3.5 मिलियन पाउंडचे (जवळपास 3300 कोटी रुपये) अनुदान दिले आहे. मित्तल परिवाराने हे अनुदान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या  व्हॅक्सीनॉलॉजी विभागाला दिले आहे. हे जेनर इंस्टिट्यूट अंतर्गत येते. या अनुदानानंतर आता याचे नाव लक्ष्मी मित्तल अॅन्ड फॅमिली प्रोफेसरशिप ऑफ व्हॅक्सीनॉलॉजी, असे झाले आहे.

व्हॅक्सीन विश्वात प्रसिद्ध -
जेनर इंस्टिट्यूटची स्थापना 2005मध्ये ऑक्सफर्ड आणि यूके इंस्टिट्यूट फॉर अॅनिमल हेल्थ सोबत पार्टनरशिपमध्ये करण्यात आली होती. व्हॅक्सीनच्या अभ्यासासाठी हे इंस्टिट्यूट जगात अव्वल दर्जाचे मानले जाते. कोरोना महामारीच्या काळात व्हॅक्सीन तयार करण्याच्या दिशेने या इंस्टिट्यूटमध्ये वेगाने काम सुरू आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मोठ्या प्रमाणावर ह्युमन ट्रायलचे काम सरू - 
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल सुरू आहे. प्रफेसर अँड्रिअन हिल जेनर इंस्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. आतापर्यंत संपूर्ण जगात 1 कोटी 23 लाख लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेपाच लाख हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जगाला महामारीसाठी तयार राहावे लागेल -
कोरोना महामारीसंदर्भात बोलताना लक्ष्मी मित्तल म्हणेल, कोरोना महामारीनंतर जगाला कुठल्याही प्रकारच्या महामारीसाठी पूर्णपणे तयार राहावे लागेल. या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच प्रफेसर हिल हे व्हॅक्सीन निर्मितीचे फार मोठे काम करत आहेत, असेही मित्तल म्हणाले.

रशियन व्हॅक्‍सीन पोहोचली तिसऱ्या टप्प्यात
ऑक्सफर्ड शिवाय रशियन डिफेन्स मिनिस्‍ट्रीने तयार केलेली व्हॅक्‍सीनही प्रभावी ठरत आहे. ही व्हॅक्सीन आता क्लिनिकल ट्रायलच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना ही व्हॅक्‍सीन देण्यात आली, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. तसेच, व्हॅक्‍सीनमुळे कसल्याही प्रकारचा साइड इफेक्‍टदेखील दिसून आलेला नाही. ही व्हॅक्सीन ज्या व्हॅलंटियर्सना देण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील इम्‍यूनिटी डेव्हलप होताना दिसत आहे. प्रोटोकॉल्सनुसार या व्हॉलंटियर्सची नियमितपणे अँटीबॉडी टेस्‍ट करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lakshmi niwas mittal gant 3.5 million pound to oxford university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.