काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान हे पाकचेच भाग -दर

By Admin | Updated: June 25, 2015 00:15 IST2015-06-25T00:15:09+5:302015-06-25T00:15:09+5:30

पाकव्याप्त चीनमधून जाणाऱ्या चीनच्या ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक कॉरिडॉरला भारताने घेतलेल्या आक्षेपाला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने गिलगिट,

Kashmir, Gilgit and Baltistan are parts of Pakistan - | काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान हे पाकचेच भाग -दर

काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान हे पाकचेच भाग -दर

इस्लामाबाद : पाकव्याप्त चीनमधून जाणाऱ्या चीनच्या ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक कॉरिडॉरला भारताने घेतलेल्या आक्षेपाला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने गिलगिट, बाल्टिस्तान व काश्मीर हा पाकचाच भाग असल्याचा दावा केला आहे.
अर्थमंत्री इशाक दर यांनी संसदेत बोलताना हा दावा केला. पाक-चीनच्या आर्थिक कॉरिडॉरला भारताने घेतलेल्या आक्षेपावर चर्चा करताना दर बोलत होते. गिलगिट, बाल्टिस्तान व काश्मीर हे वादग्रस्त नसून पाकिस्तानचेच भाग असल्याचा दावा त्यांनी केला.
वादग्रस्त भूभागातून जाणाऱ्या आर्थिक कॉरिडॉरला भारताने घेतलेला आक्षेप पाकिस्तानने आधीच फेटाळला आहे. असे दर यांनी म्हटल्याचे वृत्त डॉनने दिले आहे. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचेच आहे असाही दावा दर यांनी केला आहे.
पाकचे ग्वदार बंदर ते चीनमधील काशगर शहरापर्यंत जाणारा आर्थिक कॉरिडॉर ३ हजार कि.मी.चा असून त्यामुळे चीनचा स्वायत्त वायव्य प्रदेश गिलगिट बाल्टिस्तानला जोडला जाणार आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Kashmir, Gilgit and Baltistan are parts of Pakistan -