शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

कराचीत चिनी अधिकाऱ्याची हत्या; चीनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 5:32 PM

पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली.

ठळक मुद्देहल्लेखोराने 46 वर्षीय चेन यांच्या दिशेने नऊ गोळया झाडल्या. दुचीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी चीनने 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. 

लाहोर - पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली. त्यामुळे  पुन्हा एकदा चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरात वेगवेगळया देशांचे दूतावास आहेत. त्या भागात ही हत्या झाली. 

हल्लेखोराने 46 वर्षीय चेन यांच्या दिशेने नऊ गोळया झाडल्या. दुस-या दिवशी जिन्ना रुग्णालयात चेन यांचा मृत्यू झाला. ते शांघाय स्थित कॉस्को शिपिंग लाइन्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. 1994 पासून ही कंपनी पाकिस्तानात व्यवसाय करत आहे. कराची पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे. चीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी चीनने 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. 

याआधी सुद्धा या प्रकल्पावरील नाराजीतून अनेक चिनी नागरिकांची पाकिस्तानात हत्या झाली आहे. कराचीतील हत्येमुळे चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. चिनी नागरिकांचा विचार करता त्यांच्या जीवाला असणारा धोका वाढत जाणार आहे असे माजी लष्करी अधिकारी इकराम सेहगल यांनी सांगितले. पाथफाईंडर ग्रुप या पाकिस्तानातील सर्वात मोठया सुरक्षा कंपनीचे ते चेअरमन आहेत. 

सीपीईसी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्कराने 15 हजाराची विशेष फोर्स उभी केली आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे चीनचा शिनजियांग प्रात आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर जोडले जाणार आहे.  सीपीईसी प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले आहेत.  ऑक्टोंबर महिन्यात पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर अज्ञात आरोपींनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले होते. 

हे बंदर सीपीईसी प्रकल्पाचा भाग आहे. ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. या भागात विपुल साधन संपत्ती आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठा विरोध आहे. हे बंदर पश्चिम चीनला मध्यपूर्व आणि युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी काम करणा-या चिनी नागरीकांवर यापूर्वीही इथे हल्ले झाले आहेत. 

वसतिगृहात कामगार जेवायला बसलेले असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकले अशी माहिती पोलीस अधिकारी इमाम बक्षी यांनी दिली. पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करत असल्याने बलुचिस्तानातल्या अनेक गटांचा सीपीईसी प्रकल्पाला विरोध आहे. बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सुद्धा सक्रीय आहेत. दहशतवादी हल्ले करुन इथे सुरु असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 2014 पासून आतापर्यंत बलुचिस्तानात 50 कामगारांची हत्या झाली आहे. 

टॅग्स :CPECसीपीईसीPakistanपाकिस्तान