शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिंदाल यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’

By admin | Updated: January 25, 2015 01:32 IST

‘आपण केवळ अमेरिकी आहोत ना की भारतीय अमेरिकी’ या ल्युसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या वक्तव्याचा संसद सदस्य जोए क्राउले यांनी निषेध केला आहे.

वॉशिंग्टन : ‘आपण केवळ अमेरिकी आहोत ना की भारतीय अमेरिकी’ या ल्युसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या वक्तव्याचा संसद सदस्य जोए क्राउले यांनी निषेध केला आहे. जिंदाल ओळखीच्या संकटातून (आयडेंटिटी क्रायसिस) जात आहेत, असेही ते म्हणाले. क्राउले हे भारतीय- अमेरिकी समुदायात अत्यंत लोकप्रिय संसद सदस्य आहेत. आपणास भारतीय-अमेरिकी म्हणून नाहीतर केवळ अमेरिकी म्हणून ओळखले जावे, असे जिंदाल यांनी म्हटले होते. त्याबाबत छेडले असता काँग्रेस सदस्य क्राउले म्हणाले की, जिंदाल ओळखीच्या संकटातून जात आहेत, असे वाटते. हे त्यांच्यासाठी खूप दु:खद आहे. या आठवड्यात लंडनमध्ये दिलेल्या भाषणात जिंदाल यांनी म्हटले होते की, माझे आई-वडील अमेरिकी स्वप्नाच्या शोधात आले होते व आणि ते साकारही केले. त्यांच्यासाठी अमेरिका ही केवळ स्थान नव्हते तर एक विचार होता. माझ्या माता-पित्याने मला व माझ्या भावाला आपण केवळ अमेरिकी नागरिक बनण्यासाठी येथे आलो आहोत ना की भारतीय अमेरिकी. क्राउले अमेरिकी संसदेतील भारतावरील संसद सदस्यांच्या गटाचे संस्थापक सदस्य असून, त्यांनी या गटाचे सहअध्यक्षपदही भूषविले आहे. या गटाच्या सहअध्यक्षपदी आता भारतीय अमेरिकी काँग्रेस सदस्य अ‍ॅमी बेरा भूषवीत आहेत. बेरा कॅलिफोर्निया येथून दोन वेळा निवडून आले असून ते सध्या एकमेव भारतीय अमेरिकी संसद सदस्य आहेत. क्राउले यांनी जिंदाल यांच्या या वक्तव्याचा निषेध करताना अ‍ॅमी बेरा यांना आपल्या ओळखीबाबत ही चिंता नसल्याचे म्हटले आहे. बेरा यांनीही जिंदाल यांच्या या विचाराशी अहसमती दर्शविली. भारतीय अमेरिकी म्हणून ओळखल्या जाण्याविषयी मला कोणतीही समस्या नाही. मी नेहमीच माझ्या आई-वडिलांविषयी बोलत असतो. मला माझ्या आई-वडिलांविषयीही गर्व आहे. त्यानंतर अमेरिकेने जे काही दिले त्याबद्दल गर्व आहे. मला माझ्या कहाणीची कधीही लाज वाटली नाही. (वृत्तसंस्था)मी न्यूयॉर्कचा आहे. मला माझ्या आयरिश मूळाचा खूप अभिमान आहे. मी आयरिश अमेरिकन किंवा अमेरिकन आयरिश असेन. मात्र, सर्वांत आधी मी अमेरिकी आहे. जिंदाल जे मानतात ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपण अमेरिकी आहोत हे वास्तव ते सांगू इच्छितात. माझे पूर्वज कुठून आले याबाबत मला कोणताही अपराधीपणा वाटत नाही. उलट ते उघड करावे, असे मला वाटेल. मी याची प्रशंसा करीन. - जोए क्राउले