शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला! राजधानी तेहरान बॉम्बिंगनं हादरली; आतापर्यंत किती मृत्यू? काय सांगतात आकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:40 IST

इराण आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, इस्त्रायलने इराणमधील शस्त्र निर्मिती केंद्रांवर आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

मध्य-पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणवर जबरदस्त बॉम्बिंग केली. इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांसंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होण्यापूर्वीच इस्त्रायलने हे हल्ले केले. इराण आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, इस्त्रायलने इराणमधील शस्त्र निर्मिती केंद्रांवर आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

तेहरानमधील हल्ल्यांदरम्यान लेबनॉनची राजधानी बैरूतच्या आकाशातही धुराचे लोट दिसले. मात्र, यासंदर्भात इस्रायलने अधिकृत पुष्टी केलेली नाही. दरम्यान, इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी इस्त्रायली सैन्य सज्ज असून संपूर्ण देशात हवाई हल्ल्यांचे सायरन वाजत आहेत. याशिवाय, इराणनेही आखाती शेजारी देशांवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. कुवेत आणि संयुक्त अरब अमीरात दोन्ही ठिकाणी इराणमधून येणारी ड्रोन आणि मिसाइल्सची माहिती समोर आली आहे.

२,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकन जहाजांचा ताफा... -कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी ताकद वाढवली आहे. सुमारे २,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकन जहाजांचा ताफा या क्षेत्राजवळ पोहोचला आहे. याशिवाय, शत्रूच्या भागात उतरून विमानतळ सुरक्षित करण्यात तज्ज्ञ असलेल्या '८२ व्या एअरबोर्न'च्या किमान १,००० पॅराट्रूपर्सना तातडीने तैनात होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

भीषण जीवितहानी -या युद्धात आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली आहे. इराणमध्ये १९०० हून अधिक, तर लेबनॉनमध्ये ११०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलमध्ये १८ नागरिकांचा आणि लेबनॉनमध्ये ३ इस्त्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात १३ अमेरिकन सैनिक, वेस्ट बँकमध्ये ४ आणि आखाती देशांमध्ये २० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Attacks Iran: Tehran Rocked by Blasts, Casualties Reported

Web Summary : Israel launched heavy bombing on Iran, targeting infrastructure amid rising Middle East tensions. Military buildup includes US naval presence. Casualties are high, with deaths reported in Iran, Lebanon, Israel, and among American personnel. Diplomatic talks are ongoing alongside escalating conflict.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाDeathमृत्यू