इराणच्या ७ नेत्यांचा खात्मा करायला इस्रायल-अमेरिकेने पुकारलंय युद्ध; कोण आहेत 'ते' लोक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 19:59 IST2026-02-28T19:57:55+5:302026-02-28T19:59:06+5:30

7 Iran leaders on Israel US Hit List: अमेरिकेला हवाय इराणमध्ये सत्तापालट, 'मोठा गेम' करण्याची तयारी सुरु

Israel-US declared war to eliminate 7 Iranian leaders along with Ali Khamenei top on the hit list | इराणच्या ७ नेत्यांचा खात्मा करायला इस्रायल-अमेरिकेने पुकारलंय युद्ध; कोण आहेत 'ते' लोक?

इराणच्या ७ नेत्यांचा खात्मा करायला इस्रायल-अमेरिकेने पुकारलंय युद्ध; कोण आहेत 'ते' लोक?

7 Iran leaders on Israel US Hit List: अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणमध्ये संभाव्य सत्तापालट करण्याच्या हेतुने सात नेते आणि लष्करी अधिकारी इस्रायली अमेरिकेच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्याही किंमतीत हल्ले आणि गोपनीय ऑपरेशनद्वारे या सात व्यक्तींना संपवण्याचा अमेरिकेचा मानस आहे. हे साध्य करण्यासाठी लक्ष्यित हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेला नको असलेले ते सात नेते आणि अधिकारी कोण आहेत, जाणून घेऊया.

ते सात लोक कोण?

अमेरिकन आउटलेट अ‍ॅक्सिओसने इस्रायली आणि अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, ज्या उद्देशासाठी युद्ध सुरू करण्यात आले होते. त्यासाठी सात व्यक्तींना मारणे आवश्यक आहे. अमेरिका आणि इस्रायल सर्व सात नेत्यांना मारून इराणची स्थिती कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई हे यादीत सर्वात वर आहेत. इस्रायलने त्यांच्या तेहरानमधील घरावरही हल्ला केला होता. खामेनेई त्यावेळी तेहरानमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांना काहीही झाले नाही. त्यांच्याव्यतिरिक्त, राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियान हेदेखील अमेरिकेच्या हिटलिस्टवर आहेत. म्हणूनच पजेश्कियान यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला होता.

याशिवाय, इराणच्या परिषदेचे सर्वोच्च सचिव अली लारीजानी, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर अहमद वाहिदी, खामेनेई यांचे सर्वोच्च सुरक्षा सल्लागार अली शामखानी, माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचाही खात्मा करू करण्यासाठी अमेरिका इच्छूक आहे. कारण हे सर्व नेते इराणचे सर्वोच्च धोरणकर्ते आहेत.

भविष्यातील नेते लक्ष्यावर

अहवालांनुसार, अमेरिका इराणच्या भावी नेत्यांनाही लक्ष्य करत आहे. अलिकडेच, इराणच्या सर्वोच्च नेत्याने प्रत्येक विद्यमान नेत्यासाठी चार उत्तराधिकारी नियुक्त केले आहेत, जेणेकरून युद्ध झाल्यास इराण नेतृत्वहीन राहणार नाही. म्हणूनच, इराणमध्ये सत्तापालट झाल्यास अमेरिका आणि इस्रायलला किमान १,००० वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांना संपवावे लागेल. द टेलिग्राफच्या मते, यासाठी अमेरिकेला इराणमध्ये किमान १० लाख सैन्य तैनात करावे लागेल. त्यानंतरच करार होईल. अ‍ॅक्सिओसने इस्रायली अधिकाऱ्यांचा उल्लेख करून म्हटले आहे की, जर युद्धादरम्यान इराणी जनता रस्त्यावर उतरून सत्तापालट करत नसेल, तर आम्ही आमच्या भविष्यातील रणनीतीचा विचार करू.

अमेरिकेला सत्तापालट का हवा आहे?

१९७९च्या इस्लामिक क्रांतीपासून इराण अमेरिकेच्या नियंत्रणाबाहेर आहे. इराण हा मध्य पूर्वेतील एक महत्त्वाचा देश आहे, जो अमेरिकेच्या धोरणांचा कट्टर विरोधक आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे, जिथून २० टक्के जागतिक व्यापार जातो. शिवाय, इराणकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तेल साठे आहेत. मध्य पूर्वेत इराणच्या अनेक प्रॉक्सी संघटना आहेत, ज्या अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना सतत त्रास देत आहेत.

Web Title : ईरान के 7 नेता अमेरिका-इजराइल के निशाने पर: क्या युद्ध का ऐलान है?

Web Summary : खबर है कि अमेरिका और इजराइल खामेनेई समेत ईरान के 7 नेताओं को निशाना बना रहे हैं, जिसका मकसद ईरान को कमजोर करना और संभावित रूप से सत्ता परिवर्तन को बढ़ावा देना है। यह कार्रवाई अमेरिकी नीतियों के प्रति ईरान के विरोध से उपजी है।

Web Title : Iran's 7 leaders on US-Israel hit list: War declared?

Web Summary : US & Israel reportedly target 7 Iranian leaders, including Khamenei, aiming to weaken Iran and potentially instigate regime change. This action stems from Iran's opposition to US policies.