इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:02 IST2025-06-27T17:01:27+5:302025-06-27T17:02:04+5:30
Israel-Lebanon: इस्रायली सैन्याने या भागात भीषण हल्ले केले आहेत.

इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव...
Israel-Lebanon:इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवस चाललेला भीषण संघर्ष युद्धविरामाने थांबला. मध्यपूर्वेतील परिस्थिती आता काहीशी सामान्य होईल, असे मानले जात होते. परंतु इस्रायलने अचानक आपले लक्ष लेबनॉनकडे वळवले आहे. शुक्रवारी इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ उडाला झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या भागात अचानक मोठे स्फोट ऐकू आले, इस्रायली लढाऊ विमानांच्या गर्जनाही झाल्या. याशिवाय, दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागात पाळत ठेवणारे ड्रोन देखील उडताना दिसले.
हल्ले का केले?
इस्रायली सैन्याने म्हटले की, त्यांनी हे हल्ले हिज्बुल्लाहच्या कारवाया थांबवण्यासाठी केले. दक्षिण लेबनॉनमधील नबतियाह अल-फौका आणि इक्लिम अल-तुफाहच्या टेकड्यांवरील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये हिज्बुल्लाहच्या पायाभूत सुविधा आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले.
शफाक न्यूजच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सांगितले की, इस्रायली लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील माउंट शुकेफ भागात एका लपण्याच्या ठिकाणाला लक्ष्य केले. हे लपण्याचे ठिकाण हिजबुल्लाहच्या अग्नी नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणेचे संचालन करण्यासाठी वापरले जात होते. इस्रायली सैन्याच्या मते, हे एका भूमिगत प्रकल्पाचा भाग आहे, जे पूर्वी इस्रायली हल्ल्यांमध्ये नुकसान झाले होते, परंतु आता ते पुन्हा बांधले जात आहे.
झुकणार नाही, लढाई सुरूच राहील
लेबनॉनच्या न्यूज पोर्टल नाहारनेटनुसार, हल्ल्याच्या एक दिवस आधी हिजबुल्लाहचे उपप्रमुख शेख नैम कासिम यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, लेबनॉन कोणाच्याही दबावाखाली येणार नाही.त्यांहा आमचा देश आहे, आम्हाला तो आदराने हवा आहे आणि आम्ही त्यासाठी लढू.