बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली; ट्विटकरून मोदींना घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 00:18 IST2026-03-01T00:16:08+5:302026-03-01T00:18:43+5:30

Israel Iran War Update: इराण-इस्रायल युद्धामुळे दुबईत अडकली बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान. उड्डाणे रद्द झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे सुरक्षित वापसीसाठी केली कळकळीची विनंती. वाचा सविस्तर अपडेट.

Israel Iran War Update Famous Bollywood actress Sonal Chauhan stuck at Dubai airport; tweets to Modi | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली; ट्विटकरून मोदींना घातली साद

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली; ट्विटकरून मोदींना घातली साद

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या भीषण युद्धामुळे पश्चिम आशियात हाहाकार माजला आहे. या युद्धाचा फटका आता भारतीय सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे. बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली असून तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली आहे.

'जन्नत' फेम अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये एका शूटिंगसाठी गेली होती. मात्र, इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दुबईचे हवाई क्षेत्र प्रभावित झाले असून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोनलने सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत म्हटले की, "मी सध्या दुबईत अडकली आहे, इथली परिस्थिती चिंताजनक असून आम्हाला सुरक्षित भारतात परतण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत मिळावी."


विमानतळावर प्रवाशांचा आक्रोश
केवळ सोनलच नाही, तर हजारो भारतीय प्रवासी दुबई विमानतळावर अडकले आहेत. विमानतळावर प्रचंड गर्दी असून अन्न-पाण्यावरून प्रवाशांचे हाल होत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. दुबईच्या प्रसिद्ध 'पाम जुमेराह' परिसरातही क्षेपणास्त्रांचे आवाज ऐकू आले आहेत, ज्यामुळे तेथे भीतीचे वातावरण आहे. दुबईसह अबुधाबी व इतर विमानतळांवरही रात्रभरात हल्ले झाले आहेत.

युद्धाचे भीषण आकडे
इराणी रेड क्रिसेंटच्या रिपोर्टनुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या या संयुक्त हल्ल्यात आतापर्यंत २०१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. प्रत्युत्तरात इराणने दुबईतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे डागल्याने संपूर्ण यूएईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title : दुबई में फंसी बॉलीवुड अभिनेत्री, मोदी से मदद की गुहार।

Web Summary : ईरान-इजराइल संघर्ष के बीच, अभिनेत्री सोनल चौहान उड़ान रद्द होने के बाद दुबई में फंसी। उन्होंने पीएम मोदी से सुरक्षित वापसी की अपील की। तनावपूर्ण स्थिति और उड़ान व्यवधानों के कारण हजारों यात्री दुबई हवाई अड्डे पर फंसे हुए हैं।

Web Title : Bollywood actress stranded in Dubai, appeals to Modi for help.

Web Summary : Amidst Iran-Israel conflict, actress Sonal Chauhan is stuck in Dubai after flight cancellations. She appealed to PM Modi for safe return. Thousands of passengers are stranded at Dubai airport due to the tense situation and flight disruptions.