शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पॅलेस्टाइनमध्ये 11 दिवस तांडव केल्यानंतर इस्रायलची सीझफायरची घोषणा, लोकांचा रस्त्यावर उतरून जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:41 AM

इस्रायल आणि हमास यांच्यातील गेल्या आनेक दशकांचा विचार करता, हा सर्वात भीषण संघर्ष होता, असे म्हटले जात आहे.

गाझा - इस्रायल आणि पॅलेस्टाइनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात सीझफायर लागू करण्यात आले आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये शांताता आहे आणि लोक जल्लोष करत आहेत. 11 दिवस चाललेल्या या भयंकर संघर्षात 232 पॅलेस्टिनी लोकांचा बळी गेला आहे. तर इस्रायलचेही 11 लोक मारले गेले आहेत. आजार संपेपर्यंत हल्ले सुरूच राहतील, अशी घोषणा करणाऱ्या इस्रायलकडून सीझफायरची घोषणा करण्यात आली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील गेल्या आनेक दशकांचा विचार करता, हा सर्वात भीषण संघर्ष होता, असे म्हटले जात आहे. या काळात हमासकडून 4 हजारहून अधिक रॉकेट डागण्यात आले. तर इस्रायलनेही गाझामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून आणि बॉम्ब वर्षाव करून शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त केला. या भीषण संघर्षानंतर सीझफायरची घोषणा झाल्यानंतर लोकांच्या आनंदाला पारावार नव्हता. लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करत होते.

गाझाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे, की 10 मेपासून सुरू असलेल्या संघर्षात 232 पॅलेस्टिनी नागरीक मारले गेले आहेत. यात 65 मुलांचा समावेश आहे. तर 39 महिला ठार झाल्या आहेत. इस्रायली हल्ल्यात 1900 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले आहेत. तर तिकडे, इस्रायलने दावा केला आहे, की त्यांनी हमास आणि इस्‍लामिक जिहाद सारख्या गटांचे किमान 160 जणांना मारले आहे. इस्रायलमध्येही 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर रॉकेट हल्ल्यांत शेकडो लोक जखमी झाले आहेत.

Israel Palestain Conflict : पॅलेस्टाइनवर हल्ले सुरू असतानाच इस्रायल चीनवर भडकला! म्हणाला...

आम्हीच जिंकलो, दोन्ही पक्षाचा दावा -युद्धबंदीनंतर, दोन्ही पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे. युद्धबंदीच्या घोषणेनंतर मशिदींमधून लाउड स्‍पीकरवरही याची घोषणा करण्यात आली. यात दावा करण्यात आला आहे, की इस्रायलसोबत 'स्‍वार्ड ऑफ जेरुसलेम'च्या युद्धात विजय मिळाला आहे. एवढेच नाही, तर शांततेच्या संबंधांचे उल्लंघण झाल्यास ते पलटवार करण्यासाठी तयार आहेत, असे दोन्ही पक्षांनी म्हटले आहे.

'आजारापासून मुक्ती हवी, केवळ मलम पट्टी नको' -सांगण्यात येते, की अमेरिकन राष्‍ट्रपती जो बायडेन यांच्या मोठ्या दबावानंतर इस्रायल सीझफायरसाठी तयार झाला आहे. तसेच इजिप्तच्या मध्‍यस्तीनंतर ही घोषणा करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. बायडेन यांनीही इजिप्तच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. तत्पूर्वी, आम्हाला आजारापासून मुक्तता हवी आहे, केवळ मलम-पट्टी नको, असे अस्रायलने म्हटले होते. 

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धPalestineपॅलेस्टाइनGaza Attackगाझा अटॅकBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू