इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:57 IST2024-09-25T16:54:39+5:302024-09-25T16:57:39+5:30
Elon Musk & Italian PM Giorgia Meloni: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे सध्या जगभरात चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत दिसत आहेत.

इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे सध्या जगभरात चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत दिसत आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर दोघांमध्येही रोमँटिक नातं असू शकतं अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. इलॉन मस्क आणि मेलोनी हे ब्लॅक टाय अॅवार्ड सोहळ्यामध्ये एकत्र दिसले होते. तसेच दोघांमध्येही अनौपचारिक जवळीक दिसली होती.
यावेळे जॉर्जिया मेलोना यांना अटलांटिक कौन्सिल ग्लोब सिझिझन अॅवार्ड देताना इलॉन मस्क म्हणाले की, एका अशा महिलेला पुरस्कार देणं हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे जी बाहेरून जेवढी सुंदर आहेत त्यापेक्षा अंत:करणामधून अधिक सुंदर आहे. जॉर्जिया मेलोनी या अशा महिला आहेत ज्यांचं मी कौतुक करतो. त्यांनी इटलीच्या पंतप्रधान म्हणून अविश्वसनीय असं काम केलं आहे. त्या विश्वासू, प्रामाणिक आणि सच्च्या आहेत. तसेच राजकारण्यांबाबत नेहमीच असं म्हणता येत नाही, असेही इलॉन मस्क पुढे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर इलॉन मस्क आणि जॉर्जिया मेलोनी हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा लोकांनी सुरू केली. तेव्हा इलॉन मस्क यांनी स्वत: पुढे येत या चर्चांना उत्तर दिलं. टेस्ला फॅन क्लबने मस्क आणि मेलोनी यांचं छायाचित्र शेअर करत हे दोघे डेट करत आहेत, असं वाटतं का? अशी विचारणा केली होती. त्यावर स्वत: इलॉन मस्क यांनी उत्तर दिलं आणि आम्ही डेट करत नाही आहोत, असं स्पष्टपणे सांगितलं.