इराणचे प्रमुख खामेनेई दुबईला पळून जाण्याच्या तयारीत; १,३५३ कोटी ट्रांसफर केल्याने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:12 IST2026-01-15T15:11:44+5:302026-01-15T15:12:18+5:30
इस्रायली माध्यमाचा खळबळजनक दावा.

इराणचे प्रमुख खामेनेई दुबईला पळून जाण्याच्या तयारीत; १,३५३ कोटी ट्रांसफर केल्याने चर्चांना उधाण
Iran Protest:इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनीई आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुबईला पळून जाण्याचा विचार करत आहेत. हा दावा इस्रायली मीडिया चॅनल चॅनलने केला आहे. चॅनलने म्हटले की, इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे खामेनीईंच्या मुलाने १.५ अब्ज रुपये (१३५३ कोटी रुपये) दुबईला ट्रांसफर केले आहेत. दरम्यान, इराण सरकारने या प्रकरणावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.
अयातुल्ला अली खामेनीईंच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी मन्सूरेह खोजस्तेहसह १० हून अधिक सदस्य आहेत. खामेनी स्वतः चार मुले आणि दोन मुलींचे वडील आहेत. खमेनींव्यतिरिक्त, त्यांचा मुलगा मोज्तबा खमेनी देखील इराणमध्ये खूप शक्तिशाली आहे. इराणमध्ये खमेनींच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांना एक मजबूत दावेदार मानले जाते.
दुबईला पळून जाण्याची चर्चा का सुरू आहे?
वॉशिंग्टन पोस्टनुसार, इराण आणि इस्रायलने रशियाच्या मदतीने एक करार केला आहे. या करारात असे म्हटले आहे की, कोणताही देश दुसऱ्यावर पहिला हल्ला करणार नाही. अशा परिस्थितीत, युएई इराणसाठी सुरक्षित देश आहे. इराण आणि युएईचे व्यापारी संबंधदेखील आहेत. जून २०२५ मध्ये इस्रायल आणि इराणमधील युद्ध सोडवण्यात युएईने मोठी भूमिका बजावली होती.
रशियाला जाण्याचीही चर्चा झाली होती
दुबईपूर्वी, खमेनी कुटुंब रशियाला पळून जाण्याचीही चर्चा झाली होती. ब्रिटनच्या द टाईम्सने वृत्त दिले आहे की संकटात, खमेनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह रशियाला पळून जाऊ शकतात. रशिया हा इराणचा सर्वात जवळचा मित्र आहे. मात्र, या गंभीर दाव्यांवर इराण सरकारकडून किंवा खामेनेई कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.