मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत भयानक वळणावर पोहोचले आहे. इराणनेइस्रायलच्या दक्षिणेकडील बेरशेबा शहरावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असून, यामध्ये एका प्रसिद्ध केमिकल प्लांटला लक्ष्य करण्यात आले आहे. या भीषण हल्ल्यात ११ जण जखमी झाले असून, प्लांटमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात विषारी केमिकल गळतीचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
केमिकल प्लांटमध्ये हाहाकार
हा हल्ला 'नेओत होवव' औद्योगिक क्षेत्रातील 'ADAMA' या नामांकित कंपनीच्या फॅक्टरीवर झाला. ही कंपनी शेतीसाठी लागणारी कीटकनाशके आणि रसायने तयार करते. इराणचे क्षेपणास्त्र थेट प्लांटवर पडल्याने तिथे भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट कित्येक किलोमीटरवरून दिसत होते. या घटनेनंतर इस्रायलच्या 'होम फ्रंट कमांड'ने तातडीने लोकांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती, कारण घातक रसायने हवेत मिसळण्याची शक्यता होती.
३४ अग्निशमन गाड्या अन् बचावकार्य
आगीची भीषणता पाहून घटनास्थळी ३४ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. तासाभराच्या थरारानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. इस्रायलच्या पर्यावरण संरक्षण मंत्रालयाने तपासणीनंतर स्पष्ट केले की, सुदैवाने कोणताही विषारी वायू लीक झालेला नाही आणि आता नागरिकांसाठी कोणताही धोका नाही. पर्यावरण मंत्री इदित सिलमॅन यांनी सांगितले की, परिस्थिती आता सामान्य असून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
स्टेडियमसह २० ठिकाणी नुकसान
इराणच्या या हल्ल्याचा तडाखा केवळ केमिकल प्लांटलाच बसला नाही, तर शहरातील एक स्टेडियम आणि इतर २० हून अधिक महत्त्वाच्या ठिकाणांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, इराणने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुलतान एअरबेस'वर हल्ला करून अमेरिकेचे 'बोइंग E-3 सेंट्री' विमान उद्ध्वस्त केल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने अद्याप या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Web Summary : An Iranian missile struck a chemical plant in Beersheba, Israel, injuring 11. A fire erupted, raising fears of toxic leaks, but firefighters contained it. Other sites, including a stadium, also sustained damage. Iran claims to have destroyed a US aircraft in Saudi Arabia, a claim the US has not confirmed.
Web Summary : ईरान का मिसाइल बीरशेबा, इस्राइल में एक केमिकल प्लांट पर गिरा, 11 घायल। आग लगने से जहरीले रिसाव का खतरा था, लेकिन दमकल कर्मियों ने इसे नियंत्रण में किया। एक स्टेडियम सहित अन्य स्थानों को भी नुकसान पहुंचा। ईरान ने सऊदी अरब में एक अमेरिकी विमान को नष्ट करने का दावा किया, जिसकी अमेरिका ने पुष्टि नहीं की है।