इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले, थँक यू इंडिया; भारतीय देणग्या विसरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 07:18 IST2026-03-28T07:16:51+5:302026-03-28T07:18:57+5:30

इराणने इस्रायलवर ८३ वा क्षेपणास्त्र हल्ला केला. यावेळी, क्षेपणास्त्रांवर थँक यू इंडिया असे लिहिले होते.

iran wrote thank you india on missiles fired at Israel indian children donations will never be forgotten | इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले, थँक यू इंडिया; भारतीय देणग्या विसरणार नाही

इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले, थँक यू इंडिया; भारतीय देणग्या विसरणार नाही

तेहरान:इराणने इस्रायलवर ८३ वा क्षेपणास्त्र हल्ला केला. यावेळी, क्षेपणास्त्रांवर थँक यू इंडिया असे लिहिले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये इराणी सैनिक क्षेपणास्त्रांवर- थँक यू पीपल ऑफ इंडिया-असे लिहित असल्याचे दिसत होते. स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनीसाठीही असेच संदेश लिहिले.

इराणने म्हटले आहे की, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या देशांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डनुसार, लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून केलेला हा ८३ वा हल्ला होता. या हल्ल्यांमध्ये इस्रायली तळ तसेच आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. 

भारतीयाचा मृतदेह आणणार

अबुधाबीमध्ये क्षेपणास्त्राच्या अवशेषांमुळे ठार झालेल्या भारतीय नागरिकाचा मृतदेह लवकरच भारतात परत आणला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

रशियावर इराणला मदत केल्याचा जर्मनीचा आरोप

रशियाने इराणला हल्ल्याची लक्ष्ये निश्चित करण्यात मदत केल्याचा आरोप जर्मनीने केला आहे. फ्रान्समधील जी-७ बैठकीदरम्यान, जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले की, रशिया युक्रेन युद्धावरून लक्ष विचलित करण्यासाठी मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाचा वापर करत आहे.

रशिया इराणला संभाव्य हल्ल्याच्या लक्ष्यांची माहिती पुरवत आहे. मध्य-पूर्व आणि युक्रेनमधील संघर्ष एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांना करता येणार नाही.

इराणच्या पोलाद कारखान्यांवर हल्ला

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या दोन मोठ्या पोलाद कारखान्यांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्फहानमधील खुझेस्तान स्टील प्लांट आणि मुबारकेह स्टील फॅक्टरीचे नुकसान झाले.

भूदल तैनात केल्यास...

इराणचे म्हणणे आहे की, जर अमेरिकेने भूदल पाठवले तर परिस्थिती हाताळणे शक्य होणार नाही. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर त्यांनी भूदल तैनात केले, तर परिस्थिती हाताळणे कठीण होईल. अमेरिका आपल्या स्वतःच्या सैनिकांचे योग्य संरक्षण करण्यास असमर्थ आहे, तर इराणी भूमीवर त्यांचे संरक्षण कसे करणार? 

भारतीय मुलांच्या देणग्या कधीही विसरणार नाही

भारतातील इराणी दूतावासाने म्हटले आहे की, आम्ही हे कधीही विसरणार नाहीत. भारतीय मुलांनी दिलेल्या देणग्या ही एक प्रेमाची भेट आहे. लहान मुलांनी स्वतःच्या हातांनी केलेली मदत खूप विशेष आहे आणि ती दोन्ही देशांमधील संबंधांची खोली दर्शवते.

इराणमध्ये क्रिप्टोचा वापर

अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर इराणमध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर वेगाने वाढला आहे. २८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान १० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे क्रिप्टो व्यवहार झाले. 
 

Web Title : ईरान ने इस्राइल पर दागे मिसाइलों पर लिखा, 'थैंक यू इंडिया'

Web Summary : ईरान ने इस्राइल पर दागे मिसाइलों पर भारत को धन्यवाद दिया, समर्थन स्वीकारा। स्पेन, पाकिस्तान और जर्मनी को भी धन्यवाद कहा। यह इशारा इस्राइली और अमेरिकी ठिकानों पर मिसाइल हमलों के बाद आया है। अबू धाबी में मारे गए एक भारतीय का शव जल्द ही भारत लौटेगा।

Web Title : Iran Writes 'Thank You India' on Missiles Fired at Israel

Web Summary : Iran thanked India on missiles fired at Israel, acknowledging support. They also expressed gratitude to Spain, Pakistan, and Germany. The gesture follows missile strikes on Israeli and US targets. The body of an Indian killed in Abu Dhabi will return home soon.