"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:08 IST2026-01-09T10:08:16+5:302026-01-09T10:08:58+5:30
ट्रम्प म्हणाले, "मी त्यांना सांगितले आहे, तेथे मोठ्या प्रमाणावर दंगे होतात. दंगलीवेळी तेथे ज्या पद्धतीने लोक मारले जातात, तशीच आंदोलक लोकांच्या हत्या करण्यास सुरुवात केली तर, आम्ही कठोर शिक्षा करू."

"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराण सरकारला थेट इशारा दिला आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलन अधिकाऱ्यांनी कृरपणे दाबण्याचा प्रयत्न केला अथवा आंदोलकांच्या हत्या झाल्यास, अमेरिका शांत बसणार नाही, अमेरिकाही थेट अॅक्शन घेईल, असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. याचवेळी, इराणी जनतेला उद्देशून, तुम्हाला स्वातंत्र्यावर दृढ विश्वास असला हवा. तुमचा देश एक महान देश होता," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते रेडिओ होस्ट ह्यू हेविटशी बोलत होते.
ट्रम्प म्हणाले, "मी त्यांना सांगितले आहे, तेथे मोठ्या प्रमाणावर दंगे होतात. दंगलीवेळी तेथे ज्या पद्धतीने लोक मारले जातात, तशीच आंदोलक लोकांच्या हत्या करण्यास सुरुवात केली तर, आम्ही कठोर शिक्षा करू."
...तर भयानक परिणाम भोगावे लागतील -
खरे तर, इराणमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे देशातील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत जवळपास ४५ जणांचा मृत्यू झाल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात हेविटने प्रश्न केला असता, काही मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाले. यासाठी कुणा एकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. मात्र, इराणने हिंसाचाराच्या मार्गावर गेला तर, त्यांना त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
"आपला देश एक महान देश होता..." -
दरम्यान, इराणमधील आंदोलन कर्त्यांसाठी आपला काय संदेश असेल? असे विचारले असता, ट्रम्प म्हणाले, "आपण (इराणची जनता) स्वतंत्र्यावर गाढा विश्वास ठेवायला हवा. आपण शूर लोक आहात. आपल्या देशाच्या बाबतीत जे काही घडले, ते लज्जास्पद आहे. आपला देश एक महान देश होता."
रेझा पहलवी यांच्या संदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, यावेळी रजा पहलवी यांना भेटण्याचा कुठलाही हेतू नाही. मी त्यांना बघितले आहे. ते एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यांना आताच भेटने योग्य ठरेल, असे मला वाटत नाही. सर्वांना संधी द्यायला हवी आणि कोण पुढे येते ते बघायला हवे, असे मला वाटते, असेही ट्रम्प म्हणाले."