अमेरिकेने थेट सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचीच हत्या केल्याने इराण खवळला आहे. इराणकडून अमेरिकेच्या हवाई तळांनाच लक्ष्य केले जात असून, आतापर्यंत ६५० अमेरिकेचे जवान मारल्या गेल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, अमेरिकेने पहिल्यांदाच युद्धात मारल्या गेलेल्या जवानांचा आकडा जाहीर केला असन, चार जवानांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले करत युद्ध छेडले. अमेरिकेचे एपिक फ्युरी आणि इस्रायलचे रोरिंग लायन अशी ऑपरेशन इराणविरोधात सुरू करण्यात आली. त्याला उत्तर म्हणून इराणने ट्रू प्रॉमिस ४ ऑपरेशन सुरू केले आहे.
इराण अमेरिकेची हवाई तळे असलेल्या शेजारी देशांतच हवाई हल्ले करत आहे. अमेरिकेचे दूतावास, हवाई तळे आणि फायटर जेट इराण लक्ष्य करत आहे. इराणने रविवारी (१ मार्च) कुवैतमध्ये अमेरिकेच्या तळावर ड्रोन्स डागले. यात सहा जवान मारले गेले आहेत.
युद्धात मारलेले गेलेले अमेरिकेचे जवान कोण?
पेंटागनने अमेरिकेचे सहा जवान इराणच्या हल्ल्यात मारले गेले असल्याची माहिती दिली आहे. चार जवानांची ओळख पटली असून, त्यांचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दोन जवानांची अजून ओळख पटलेली नाही.
युद्धात मारल्या गेलेल्या जवानांमध्ये कॅप्टन कोडी खोर्क (वय ३५), सार्जेंट फर्स्ट क्लास नोआ टिटजेंस (वय ४२), सार्जेंट क्लास निकोल अमोर (वय ३९) आणि सार्जेंट डेक्लान कोडी (वय २०) यांचा समावेश आहे. या जवानांना लष्कराच्या रिझर्व्ह सस्टेनमेंट युनि १०३ मध्ये तैनात केलेले होते. जेवण, इंधन, पाणी आणि शस्त्रसाठा, सामानाचा पुरवठा करण्याचे काम हे युनिट करते.
अमेरिकेचे ६५० जवान मारले, इराणचा दावा
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने , दोन दिवसांमध्ये अमेरिकेचे ६५० पेक्षा अधिक जवान मारल्याचा दावा केला आहे. आयआरजीसीचे प्रवक्ते ब्रिगेडियअर जनरल अली मोहम्मद नैनी यांनी असे सांगितले की, "इराणच्या मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये पर्शियन आखातात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना आणि युद्धनौकांना निशाणा बनवण्यात आले. त्यामुळे अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका मागे गेली."
"युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांमध्ये अमेरिकेचे ६५० सैनिक मारले गेले आहेत. जखमी झाले आहेत. अमेरिकेने झालेली हानी लपवण्याचा प्रयत्न करू नये. इराणी गुप्तचर आणि युद्धभूमीवरील अहवालांनी या आकडेवारीची पुष्टी केलेली आहे", असा दावा नैनी यांनी केला.
Web Summary : Iran claims 650 US soldiers killed in attacks. US acknowledges casualties, releasing photos of four soldiers killed in retaliatory strikes following heightened tensions and military operations between the two nations. The conflict escalates with both sides targeting military assets.
Web Summary : ईरान ने हमलों में 650 अमेरिकी सैनिकों के मारे जाने का दावा किया। अमेरिका ने हताहतों की पुष्टि की, जवाबी हमलों में मारे गए चार सैनिकों की तस्वीरें जारी कीं। दोनों देशों के बीच तनाव और सैन्य अभियानों से संघर्ष बढ़ गया है।