अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:57 IST2021-09-06T13:54:10+5:302021-09-06T13:57:56+5:30
अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानी दहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली.

अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला
अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे इराण भडकला आहे. कोणत्याही बाह्य शक्तीने, अशा प्रकारे हल्ला करणे चुकीचे असून याची चौकशी व्हायला हवी, असे इराणने म्हटले आहे. (Iran statement over pakistan attack in panjshir in Afghanistan)
अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानीदहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सोमवारी पाकिस्तानच्या या कृत्याचा निशेध केला आहे. काल रात्री झालेला हा हल्ला निंदनीय आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अफगाण नेत्यांना त्यांनी श्रद्धांजली, असे इराणने म्हटले आहे.
पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले
पंजशीरवरून संघर्ष सुरूच -
तालिबानी दहशतवादी बऱ्याच दिवसांपासून पंजशीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नॉर्दर्न अलायन्सकडून तालिबानी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जात आहे. दरम्यान, तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, नॉर्दन अलायन्सने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे. खुद्द नॉर्दन अलायन्सनेच पाकिस्तानकडून मदत पुरवली जात असल्याचा खुलासा केला होता. यापूर्वी नॉर्दन अलायन्सने युद्धबंदीचे आवाहन केले होते, पण तालिबानने ते नाकारले. तसेच, कोणताही मुद्दा चर्चा करून सोडविण्याची आपली इच्छा आहे, असेही तालिबानने म्हटले होते.
पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु