दुबई : अमेरिका इराणवर अजून दोन-तीन तीन आठवडे हल्ले करू शकते, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर गुरुवारी इराणने इस्रायल आणि आखाती देशांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराण युद्धबंदीला सध्या तरी राजी नसल्याचे दिसून आले. या हल्ल्यांबरोबर इराणच्या लष्कराचे प्रवक्ते इब्राहिम झोलफिकारी यांनी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, दारुगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रे गुप्तपणे कार्यरत असल्याचा दावा केला आहे. अमेरिका व इस्रायलने इराणची जी लष्करी ठाणी, केंद्रे उद्ध्वस्त केली आहेत, त्यांचे महत्त्व अत्यंत कमी असून इराणने लपवलेल्या लष्करी साहित्याची माहिती अमेरिकेला मिळू शकणार नाही, असा दावा झोलफिकारी यांनी केला.
४० देशांची शिखर परिषद सुरू
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलपुरवठा सुरळीत होण्यासाठी गुरुवारी ब्रिटनच्या नेतृत्वाखाली ४० देशांमध्ये शिखर परिषद सुरू झाली. ही परिषद आभासी स्वरुपात असून सर्व उपस्थित देशांनी इराणच्या आक्रमणाचा निषेध केला. या शिखर परिषदेच्या माध्यमातून राजनैतिक व कूटनीती वापरून उपाय काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. भारतही या बैठकीला उपस्थित होता.
'७० लाख नागरिक अमेरिकेविरोधात लढण्यास तयार'
इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाधेर कालिबाफ यांनी अमेरिकेच्या सैन्याविरोधात लढण्यासाठी इराणचे ७० लाख नागरिक तयार असल्याचा दावा केला. या नागरिकांनी स्वतःहून अमेरिकेविरोधात लढण्यासाठी आपली तयारी दाखवल्याचे कालिबाफ यांनी एक्स या सोशल मीडियावर म्हटले आहे.
कालीबाफ, हे अमेरिकेसोबत संभाव्य वाटाघाटीचे प्रतिनिधी मानले जात आहे, पण त्यांनी युद्धाच्या सुरुवातीपासून ऑनलाइन पोस्टद्वारे अमेरिका विरोधात अनेक इशारे दिले आहेत. कालीबाफ हे पहिले उच्चस्तरीय सरकारी अधिकारी आहेत ज्यांनी अशा आकडेवारीचा उल्लेख केला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी स्थैर्यासाठी चीनची शिष्टाई
होर्मुझ सामुद्रधुनीत स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व पक्षांशी आम्ही संवाद साधत आहोत आणि सर्वांचे प्रयत्न अपेक्षित असल्याचे चीनने म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील पेचाचे मूळ कारण अमेरिका आणि इस्रायलची बेकायदा लष्करी कारवाई आहे, असे चीनने म्हटले.
Web Summary : Amid US threats, Iran boasts secret weapons and missile strikes. 40 nations discuss Hormuz Strait stability. Iran claims 7 million ready to fight America, as China mediates.
Web Summary : अमेरिकी धमकियों के बीच ईरान ने गुप्त हथियारों का दावा किया, मिसाइल हमले किए। होर्मुज जलडमरूमध्य स्थिरता पर 40 देशों की चर्चा। ईरान का दावा, 70 लाख अमेरिकी सेना से लड़ने को तैयार, चीन मध्यस्थता कर रहा है।