शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Plane Crash : युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 11:31 IST

Ukraine Plane Crash : तांत्रिक बिघाड झाल्यानं उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत विमान अपघातग्रस्त

तेहरान: युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमानइराणची राजधानी तेहरानमध्ये कोसळलं आहे. तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमातळावरुन उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड झाला. या विमानात १८० प्रवासी होते. यातील एकही प्रवासी वाचू शकला नाही. इराणमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ विमानात उड्डाणानंतरच्या अवघ्या काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाला. विमान कोसळताच त्याला आग लागली. विमानातील प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी २२ रुग्णवाहिका, चार बस रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. मात्र विमानाला लागलेली आग भीषण असल्यानं मदतकार्य सुरूच करता आलं नाही, अशी माहिती इराणचे आपत्कालीन सेवेचे प्रमुख पिऱ्होसेन कौलीवांद यांनी दिली. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानानं बुधवारी सकाळी उड्डाण केलं. मात्र काही वेळातच विमानानं हवाई वाहतूक नियंत्रणाला माहिती पाठवणं बंद केलं. यानंतर हे विमान कोसळलं. किवच्या दिशेनं जाणारं हे विमान ३ वर्षे जुनं होतं. इराणनं त्यांच्याच देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतरच्या अवघ्या काही तासांत युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान कोसळल्याची घटना घडली. कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. यामध्ये अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणनं केला. या हल्ल्याला अमेरिकेनं दुजोरा दिला. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे.

टॅग्स :Iranइराणairplaneविमानqasem soleimaniकासीम सुलेमानीAmericaअमेरिका