शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:56 IST

अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत इराणचा एक बांधकामाधीन महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला. याचा बदला घेण्यासाठी आता ईराणनेही खाडी देशांतील आठ मोठ्या पुलांची 'हिट लिस्ट' जाहीर केली आहे...

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात आता इराणने बदल्याचा खास मास्टर प्लॅन आखला आहे. खरेतर, अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत इराणचा एक बांधकामाधीन महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला. याचा बदला घेण्यासाठी आता ईराणनेही खाडी देशांतील आठ मोठ्या पुलांची 'हिट लिस्ट' जाहीर केली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

'B-1' ब्रिजवर अमेरिकेचे दोन मोठे हल्ले -खरेतर, अमेरिकेने गुरुवारी (२ एप्रिल) इराणमधील सर्वात उंच अशा 'B-1' ब्रिजवर दोन वेळा हल्ला करून तो उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे हा पूल अद्याप पूर्णपणे तयारही झालेला नव्हता. हा पूल तेहरानला करज शहराशी जोडणारा होता. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आता इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) खाडी देशांतील पुलांना निशाणा बनवण्याचा इशारा दिला आहे. 

हे ८ महत्वाचे पूल इराणच्या 'हिट लिस्टवर' -अनादोलूने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या या हिट लिस्टमध्ये कुवेतचा 'शेख जाबेर अल-अहमद अल-सबाह सी ब्रिज', यूएईमधील 'शेख झायेद', 'अल मक्ता' आणि 'शेख खलिफा' ब्रिज, तसेच सौदी अरब आणि बहरीनला जोडणारा 'किंग फहद कॉजवे' यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जॉर्डनमधील 'किंग हुसेन', 'दामिया' आणि 'अब्दौन' हे पूलही इराणच्या संभाव्य हिटलिस्टवर आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Plans Retaliation: Gulf Bridges on 'Hit List'

Web Summary : Following the destruction of its bridge, Iran is planning retaliation. Eight key Gulf bridges are reportedly on Iran's 'hit list', escalating Middle East tensions. Bridges in Kuwait, UAE, Saudi Arabia, Bahrain and Jordan are targeted.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध