हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:34 IST2026-04-04T12:34:24+5:302026-04-04T12:34:46+5:30

Iran War News: अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकल हिने परवा हजारो भारतीयांसह तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढत उद्योग विश्वात खळबळ उडवून दिली होती. आता याच ओऱ्याकल कंपनीच्या दुबई येथील कार्यालयावर इराणने क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे.

Iran attacks office of oracle company that laid off 30,000 people, including thousands of Indians | हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 

हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 

अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकल हिने परवा तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढत उद्योग विश्वात खळबळ उडवून दिली होती. ओऱ्याकलने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. यादरम्यान, याच ओऱ्याकल कंपनीच्या दुबई येथील कार्यालयावर इराणने क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. दुबईमधील अधिकाऱ्यांनीही ओरॅकल कंपनीच्या इमारतीवर इराणी क्षेपणास्त्रांकडून हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दुबई मीडिया ऑफिसने एक्सवर पोस्ट करून या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली आहे. दुबई इंटरनॅशनल सिटीमध्ये असलेल्या ओरॅकल बिल्डिंगच्या समोरील भागावर हवाई हल्ला झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाहीत.

या हल्ल्याबाबत दुबईच्या प्रशासनाने सांगितले की, ड्रोन-क्षेपणस्त्रांद्वारे हा हल्ला इराणनेच केला आहे. संयुक्त अरब अमिराती हा आखातामधील अमेरिकेचा सहकारी देश आहे. तसेच इथे अमेरिकेचा लष्करी तळ आहे. त्यामुळे इराणकडून संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य केले जात आहे.

दरम्यान, ओरॅकल या अमेरिकन आयटी कंपनीने हल्लीच भारतामधील १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. तसेच जागतिक स्तरावर सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.  

Web Title : छंटनी के बाद ईरान ने ओरेकल के दुबई कार्यालय पर हमला किया; हजारों भारतीय प्रभावित

Web Summary : हजारों भारतीय कर्मचारियों को प्रभावित करने वाली बड़े पैमाने पर छंटनी के बाद, ईरान ने कथित तौर पर मिसाइलों से ओरेकल के दुबई कार्यालय पर हमला किया। दुबई के अधिकारियों ने हमले की पुष्टि करते हुए कहा कि इससे कोई हताहत नहीं हुआ। अमेरिका का सहयोगी यूएई ईरान द्वारा तेजी से लक्षित किया जा रहा है।

Web Title : Iran Attacks Oracle's Dubai Office After Layoffs; Thousands of Indians Affected

Web Summary : Following massive layoffs affecting thousands of Indian employees, Iran reportedly attacked Oracle's Dubai office with missiles. Dubai officials confirmed the attack, stating it caused no casualties. The UAE, a US ally, is increasingly targeted by Iran.