नवरीला प्रेग्नेंट करून लग्नाच्या दोन दिवसाआधी पळून गेला नवरदेव, कुटुंबियांनी चाकूसोबत लावून दिलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 11:31 IST2022-01-21T11:31:08+5:302022-01-21T11:31:24+5:30

Indonesia : तरूणीने नवरदेवाच्या बोलण्यात येऊन त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नाआधी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

Indonesia : Groom ran away after getting the bride pregnant then family members got married with a knife | नवरीला प्रेग्नेंट करून लग्नाच्या दोन दिवसाआधी पळून गेला नवरदेव, कुटुंबियांनी चाकूसोबत लावून दिलं लग्न

नवरीला प्रेग्नेंट करून लग्नाच्या दोन दिवसाआधी पळून गेला नवरदेव, कुटुंबियांनी चाकूसोबत लावून दिलं लग्न

इंडोनेशियाच्या (Indonesia) बालीमधून(Bali) एका फारच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला प्रेग्नेंट करून तिचा नवरदेव लग्नाच्या दोन दिवसांआधी पळून गेला. यानंतर कुटुंबियांनी तरूणीचं लग्न चाकूसोबत लावून दिलं. तरूणीने नवरदेवाच्या बोलण्यात येऊन त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नाआधी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. पण तरूणी प्रेग्नेंट झाल्यावर नवरदेव लग्नाच्या दोन दिवसाआधी पळून गेला.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, आपली अब्रू वाचवण्यासाठी कुटुंबियांनी नवरींचं लग्न धार्मिक कटारसोबत लावून  दिलं. बालीची राहणारी नी पुतु मेलिना नावाच्या तरूणीचं लग्न दोन दिवसांनी होणार होतं. मेलिनाचं लग्न कुटुंबियांच्या सहमतीने तिच्या प्रियकरासोबत होणार होतं. दोघे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत होते. जेव्हा दोघांचं लग्न ठरलं तेव्हा तरूणाने तरूणीला तयार करत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

दुसरीकडे तरूणीनेही  हा विचार केला की, आता तर लग्न होणार आहे आणि तिेही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सहमती दर्शवली. हीच चूक तिला महागात पडली. कारण तरूणी प्रेग्नेंट झाली. मेलिनाच्या गर्भात तिच्या होणाऱ्या पतीचं बाळ वाढत होतं आणि दोन दिवसांनी त्यांचं लग्न होणार होतं. पण नवरदेवाने लग्नाच्या दोन दिवसांआधी तिची साथ सोडली.

नवरदेव लग्नाच्या दोन दिवसांआधीच पळून गेला. यामुळे मेलिनाच्या घरातील लोकांनी तिचं लग्न धार्मिक कट्यारसोबत लावून दिलं. मेलिनाचं लग्न हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे होणार होतं. यानंतर नवरदेव पळून गेला त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न नवरदेवाकडे असणाऱ्या कट्यारसोबत लावून दिलं. जेणेकरून त्यांची अब्रूही वाचली आणि होणाऱ्या बाळाला आपल्या वडिलाचं नावही मिळेल.

हे पण वाचा :

ही माहिती वाचली तर कोणताच दुकानदार तुम्हाला डुप्लीकेट चार्जर देऊन फसवणार नाही!
 

Web Title: Indonesia : Groom ran away after getting the bride pregnant then family members got married with a knife