शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:20 IST

Tejas Fighter Jet Crashed at Dubai Air Show : भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबईमध्ये एका एअर शो दरम्यान कोसळले. जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

Tejas Aircraft Crash: भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानाचा भंयकर अपघात झाला. दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो दरम्यान हा अपघात घडला. हवाई कसरती सादर करण्यासाठी तेजस हवेत झेपावले होते. मात्र, काही क्षणातच ते खाली कोसळले. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग आणि धुराचे लोळ उठले. या घटनेत पायलटचा मृत्यू झाला.

दुबईतील एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमानही सहभागी झाले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ते आकाशात झेपावले होते. पण, कसरती करण्यापूर्वीच ते खाली कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली.

भारतीय हवाई दलाने तेजस विमान कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळवत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबई एअर शो-२५ दरम्यान कोसळले आहे. अधिकची माहिती घेतली जात आहे.  विमानातील पायलटचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हा अपघात का घडला, याबद्दलची अद्याप माहिती मिळालेली नाही. भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की आम्ही या अपघाताची कारणे शोधणार आहोत. या अपघातबद्दलची जी माहिती समोर येईल, ती माध्यमांना दिली जाईल.

या एअर शो साठी भारतीय हवाई दलाचे तेजस आणि सूर्यकिरण एरोबेटिक्स टीम गेल्या आठवड्यात अल मक्तोम हवाई तळावर दाखल झाली होती.

तेजस लढाऊ विमानाचा हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमैरजवळ तेजस विमान अपघातग्रस्त झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Tejas Fighter Jet Crashes During Dubai Air Show

Web Summary : A Tejas fighter jet of the Indian Air Force crashed during an air show in Dubai. The aircraft was performing aerial maneuvers when it suddenly plummeted, resulting in a large explosion and fire upon impact.
टॅग्स :fighter jetलढाऊ विमानindian air forceभारतीय हवाई दलairforceहवाईदलAccidentअपघात