शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी मारली बाजी

By admin | Updated: November 6, 2014 02:58 IST

राज्य विधानसभांसह अमेरिकेत नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारली आहे

वॉशिंग्टन : राज्य विधानसभांसह अमेरिकेत नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारली आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निकी हेले व कॅलिफोर्नियाच्या महाधिवक्ता कमला हॅरीस यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन या यादीत आघाडीचे स्थान पटकावले आहे. कोलारॅडोत रिपब्लिकनचे जनक जोशी हाउस १६ डिस्ट्रिक्ट येथून तर ओहिओत रिपब्लिकनचेच नीरज अंतानी हे स्टेट हाउस ४२ डिस्ट्रिक्ट येथून निवडून आले. सेवानिवृत्त डॉक्टर प्रसाद श्रीनिवासन कनेक्टिकट हाउस ३१ डिस्ट्रिक्ट येथून तर सॅमसिंग मिशिगन हाउस ६९ डिस्ट्रिक्ट येथून पुन्हा निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे मेरिलॅण्डमध्ये कुमार भावे आणि अरुणा मिलर यांनीही विजय मिळवला आहे. वॉशिंग्टन राज्यात डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमिला जयपाल निवडून गेल्या तर सतपाल संधू स्टेट हाउस ४२ डिस्ट्रिक्ट येथून पराभूत झाले आहेत. दरम्यान, अ‍ॅमी बेरा आणि रो खन्ना यांना कॅलिफोर्नियात काँग्रेसच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेतील एकमेव भारतीय अमेरिकी संसद सदस्य अ‍ॅमी बेरा हे रिपब्लिकन पार्टीचे त्यांचे प्रतिस्पर्धी डोग ओसे यांच्याहून ४०० मतांनी आघाडीवर आहेत. कॅलिफोर्निया गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार निल केशकरी अपेक्षेनुसार पराभुत झाले आहेत. कॅलिफोर्निया गव्हर्नरपदासाठी चौथ्यांदा रिंगणात उतरलेले डेमोक्रॅटिक उमेदवार व विद्यमान गव्हर्नर जेरी ब्राउन यांनी त्यांचा पराभव केला. कॅलिफोर्निया डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. याशिवाय मनन त्रिवेदी तिसऱ्यांदा अपयशी ठरले आहेत. ते पेन्सिलव्हेनियातील सहाव्या काँग्रेस डिस्ट्रिक्टसाठी निवडणूक रिंगणात होते. रिपब्लिकनचे उमेदवार रेयान कोस्टेलो यांनी त्यांचा पराभव केला. त्रिवेदी यापूर्वी २०१० व २०१२ मध्येही पराभूत झाले होते. लिबरटॅरियन पक्षाच्या तिकिटावर प्रतिनिधी सभेची निवडणूक लढवत असलेले अरुण व्होरा यांना मेरिलॅण्डच्या चौथ्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून पराभवाचा सामना करावा लागला.