Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:48 IST2025-10-06T10:46:24+5:302025-10-06T10:48:01+5:30
Indian shot dead in America: अमेरिकेमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली. राकेश एहगाबन असे हत्या करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव आहे.

Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
Indian Shot Dead Crime News: अमेरिकेमध्ये एका ५१ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. मॉटेल व्यावसायिक असलेल्या राकेश एहगाबन यांची मॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकानेच हत्या केली. त्यांच्यावर पिट्सबर्ग मोटेलच्या पार्किंगमध्ये गोळी झाडण्यात आली.
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील रॉबिन्सन (Robinson) येथे शुक्रवारी रात्री (३ ऑक्टोबर) ही घटना घडली. राकेश एहगाबन असे मृत मालकाचे नाव आहे. मॉटेलच्या पार्किंगमध्ये गोंधळ सुरू असल्याचे दिसल्यानंतर ते चौकशी करण्यासाठी ते बाहेर गेले होते.
राकेश यांची हत्या कशी करण्यात आली?
मिळालेल्या माहितीनुसार, रॉबिन्सन येथील पिट्सबर्ग मोटेलचे मालक राकेश एहगाबन यांना पार्किंगमध्ये गडबड सुरू असल्याचे दिसले. ते पार्किंगमध्ये आले. तिथे त्यांच्या मोटेलमध्ये थांबलेला एका ग्राहक होता.
स्टॅनली युजीन वेस्ट (वय ३७) असे त्याचे नाव आहे. राकेस यांनी स्टॅनली विचारले की, "तू ठीक आहेस का, मित्रा?"
राकेश यांचा प्रश्न ऐकल्यावर कोणताही विचार न करता स्टॅनलीने एहगाबन यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यांच्या डोक्यात गोळी लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्टॅनली त्याच्या मैत्रिणीवर झाडली गोळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश एहगाबन यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपी स्टॅनली वेस्टने मोटेलच्या पार्किंगमध्ये त्याच्या मैत्रिणीवरही गोळी झाडली होती. ती महिलाही गंभीर जखमी झाली आहे. गाडीच्या मागील सीटवर एक लहान मूलही होते, जे सुदैवाने बचावले, असे पोलिसांनी सांगितले.
हत्या केल्यानंतर स्टॅनली गेला पळून
भारतीय वंशाच्या राकेश यांची हत्या केल्यानंतर आरोपी स्टॅनली वेस्ट हा व्हॅनमधून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळातच पीटर्सबर्गमधील ईस्ट हिल्स परिसरात त्याला पकडले.
चकमकीमध्ये स्टॅनली जखमी
पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही स्टॅनलीने गोळीबार केला. एक पोलिसाला गोळ्या लागल्या आहेत. तर स्टॅनलीही गोळी लागून जखमी झाला आहे. स्टॅनली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत, तर जखमी पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी स्टॅनली युजीन वेस्ट याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.