भारतीयाची कॅनडामध्ये चाकूने वार करत हत्या, भारतीय दूतावासाने काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:51 IST2025-04-05T11:49:44+5:302025-04-05T11:51:53+5:30

एका भारतीय नागरिकांची चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कॅनडामध्ये ही घटना घडली असून, भारतीय दूतावासाने याबद्दलची माहिती दिली आहे.

Indian man stabbed to death in Canada, what did the Indian embassy say? | भारतीयाची कॅनडामध्ये चाकूने वार करत हत्या, भारतीय दूतावासाने काय म्हटलंय?

भारतीयाची कॅनडामध्ये चाकूने वार करत हत्या, भारतीय दूतावासाने काय म्हटलंय?

Crime News: परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर जीवघेणे हल्ले आणि हत्या केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना कॅनडामध्ये घडली असून, एका व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात भारतीय नागरिकाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना शनिवारी (५ एप्रिल) पहाटे ओटावा शहरानजीक असलेल्या भागात घडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय व्यक्तीवर पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीने चाकूने हल्ला करत हत्या केली. ओटावापासून जवळ असलेल्या रॉकलँड भागात ही घटना घडली आहे.

वाचा >>२५ सेकंदात ७० बंडखोरांचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ 

भारतीय दूतावासाने याबद्दलची माहिती दिली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, मयताच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे, असेही दूतावासाने म्हटले आहे. 

कॅनडातील भारतीय दूतावासाची पोस्ट

भारतीय व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती कॅनडातील भारतीय दूतावासाने दिली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, 'ओटावाच्या जवळ रॉकलँडमध्ये चाकू भोसकून एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने आम्ही दुःखी आहोत. पोलिसांनी सांगितले की, एका सशंयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही शोकाकूल कुटुंबीयांची सर्वोतोपरी मदत करण्यासाठी स्थानिक सामाजिक समुदायाच्या संपर्कात आहोत', अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.

कॅनडातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पहाटे क्लेरन्स रॉकलँडमध्ये ही हत्या करण्यात आली. एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

Web Title: Indian man stabbed to death in Canada, what did the Indian embassy say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.