शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

भारतीय आय ड्रॉप्सने अमेरिकेत संसर्ग? ५५ जणांना बाधा, ११ अंध, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 7:10 AM

इझरी केअर आर्टिफिशियल टीअर्स असे या आय ड्रॉप्सचे नाव असून, चेन्नई येथील ग्लोबल फार्मा हेल्थकेअर या औषधनिर्माण कंपनीने ते बनवले आहे. दरम्यान, या औषधाचे उत्पादन त्वरित थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

कॅलिफोर्निया :भारतीय औषध कंपनीने बनविलेल्या आय ड्रॉप्समुळे अमेरिकेत संसर्ग पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत ५५ जणांना फटका बसला असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अमेरिकन बाजारातून आपले आय ड्रॉप्स कंपनीने परत मागवले आहेत. काही दिवसांपूर्वी यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) अमेरिकींना या औषधाचा वापर तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले होते. 

इझरी केअर आर्टिफिशियल टीअर्स असे या आय ड्रॉप्सचे नाव असून, चेन्नई येथील ग्लोबल फार्मा हेल्थकेअर या औषधनिर्माण कंपनीने ते बनवले आहे. दरम्यान, या औषधाचे उत्पादन त्वरित थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.औषधाने अंधत्व, मृत्यूचा धोकाहे आय ड्रॉप कोणत्या तरी जिवाणूने दूषित असल्याचा संशय आहे. लोकांनी त्याचा वापर थांबवावा. संक्रमण जीवघेणे ठरू शकते, असे अमेरिकेच्या फूड अँड ड्रग असोसिएशनने (एफडीए) म्हटले आहे.

१२ राज्यांतील ५५ जणांना संसर्गया आय ड्रॉप्सच्या वापरामुळे अमेरिकेतील १२ राज्यांत स्युडोमोनास एरुगिनोसा नावाच्या जिवाणूचा संसर्ग पसरत आहे. हा जिवाणू मानवी रक्त, फुप्फुस व इतर अवयवांना संक्रमित करतो. आतापर्यंत ५५ जणांना याची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे, तसेच ११ जणांची दृष्टी गेली आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात स्युडोमोनास एरुगिनोसाचा संसर्ग बरा करणे खूप कठीण आहे. कारण हा जिवाणू पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक झाला आहे.

कंपनीवर छापा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोलरने चेन्नईस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेअरवर छापा टाकला. ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने म्हटले आहे की, या उत्पादनाच्या वितरकांना विनंती करत आहोत की, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक ज्यांच्याकडे परत मागवलेले उत्पादन आहे, त्यांनी ते वापरणे थांबवावे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतHealthआरोग्य