भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:11 IST2025-08-19T20:10:10+5:302025-08-19T20:11:27+5:30
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले.

भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
'ऑपरेशन सिंदूर'मध्येपाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पण, पाकिस्तानने आज पर्यंत हे मान्य केले नव्हते. दरम्यान, आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी पाकिस्तानच्या खोट्या आरोपांवर मोठा खुलासा केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या हवाई दलाच्या तळांवर आणि दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे त्यांनी कबुल केले. यामुळे आता पाकिस्तानची पोलखोल झाली आहे.
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
सेठी यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या लष्करी ताकदीचा हा एक मोठा पुरावा मानला जात आहे. वरिष्ठ राजकीय विश्लेषक आणि पंजाब प्रांताचे माजी काळजीवाहू मुख्यमंत्री नजम सेठी यांनी पाकिस्तानच्या वृत्तवाहिनी समा टीव्हीशी बोलताना सांगितले की, यावेळी भारताने आपल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे आणि अचूकतेचे प्रदर्शन केले आणि थेट पाकिस्तानच्या हवाई तळावर आणि तथाकथित "स्वातंत्र्य सैनिकांच्या" कार्यालयांना लक्ष्य केले. "भारताने दाखवून दिले आहे की त्यांची क्षेपणास्त्रे हवेतून सोडली गेली किंवा जमिनीवरून, ती त्यांचे लक्ष्य अचूकपणे गाठू शकतात. जर त्यांनी अजूनही आमच्या हवाई तळावर, जिथे विमाने उभी आहेत, लक्ष्य केले तर नुकसान खूप गंभीर असू शकते, असंही त्यांनी म्हटले.
पाकिस्तानचे मोठे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० मे दरम्यान झालेल्या भारताच्या लष्करी ऑपरेशन "ऑपरेशन सिंदूर" मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. अनेक हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि दहशतवाद्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तान सरकार कोणतेही मोठे नुकसान झाले नाही असा दावा करत राहिले. अलीकडेच, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान किमान ६ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली.
पाकिस्तानात संरक्षण यंत्रणेचा अभाव
पाकिस्तानकडे भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी एस-४०० ट्रायम्फ किंवा आयर्न डोम सारखी कोणतीही संरक्षण प्रणाली नाही, अशी कबुलीच त्यांनी दिली. "आम्हाला आमच्या कमकुवतपणा दिसल्या. सध्या आमच्याकडे भारतीय क्षेपणास्त्रांपासून बचाव करू शकेल अशी कोणतीही संरक्षण प्रणाली नाही," असे ते म्हणाले. भारताकडे रशियन बनावटीची एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली आहे.