शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-युरोप 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेचा 'थयथयाट'; आता टॅरिफवर द्यायला लागला 'ज्ञान', युरोपलाही इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:53 IST

गेल्या २००७ पासून अशा पद्धतीच्या करारासंदंर्भात चर्चा सुरू होती. झालेल्या या कराराची घोषणा १६व्या भारत-EU शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपीय आयोग अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन आणि युरोपीय परिषद अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

अमेरिकन टॅरिफचा सामना करण्यासाठी काही देश विविध प्रकारचे मार्ग शोधून काढताना दिसत आहेत. दरम्यान भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात मोठा मुक्त व्यापार झाला. या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असे संबोधले जात आहे. या करारावरून, आता ट्रम्प प्रशासनाचे प्रमुख सहकारी आणि अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी युरोपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. 

एका मुलाखतीत ते म्हणाले, "रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने युरोपच्या तुलनेत अधिक आर्थिक आणि रणनीतिक बलिदान दिले आहेत. अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले आहे. तर युरोपीय देशांनी भारतासोबत मोठा व्यापार करार केला." एवढेच नाही तर, ही युरोपची दुटप्पी भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

युरोप अप्रत्यक्षपणे स्वतःविरोधातील युद्धालाच आर्थिक मदत करतोय -  बेसेंट यांनी भारतावरील अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे समर्थन केले. ते म्हणाले, रशियन कच्चे तेल भारतात येते, यानंतर ते रिफाइन होऊन उत्पादने बनतात आणि तीच उत्पादने युरोपीय देश खरेदी करतात. यामुळे युरोप अप्रत्यक्षपणे स्वतःविरोधातील युद्धालाच आर्थिक मदत करत आहे. ट्रंप प्रशासनाने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावले असून, त्यात रशियन तेलाशी संबंधित अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक टॅरिफचाही समावेश आहे. यापूर्वी बेसेंट यांनी भारतीय रिफायनऱ्यांनी रशियन तेलाची खरेदी कमी केल्याचे सांगितले होते.

गेल्या २००७ पासून अशा पद्धतीच्या करारासंदंर्भात चर्चा सुरू होती. झालेल्या या कराराची घोषणा १६व्या भारत-EU शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपीय आयोग अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन आणि युरोपीय परिषद अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : US fumes over India-Europe deal, warns on tariffs.

Web Summary : US criticizes the India-EU trade deal ('Mother of All Deals'). US official questions Europe's stance, alleging it indirectly funds Russia through refined oil purchases from India, justifying US tariffs.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत