तेहरान : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत झाल्याने जेट इंधनाचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यातील प्रवास हंगामात विमानप्रवास महाग होण्याची शक्यता आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो; कारण, अशा उड्डाणांमध्ये इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वाढत्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आधीच भाडेवाढ किंवा इंधन अधिभार लागू करण्यास सुरुवात केली आहे.
युद्धामुळे कुवेत, सौदी अरेबिया व इराकसारख्या मोठ्या उत्पादक देशांना पुरवठ्यात अडथळे येत असल्याने उत्पादन कमी करावे लागत आहे. इराणने आखातात व्यापारी जहाजांवर हल्ले केले असून, काही तेल पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे जेट इंधनाचे दरही झपाट्याने वाढले आहेत. अमेरिकेत जेट इंधनाचा सरासरी दर दोन आठवड्यांत सुमारे २.५० डॉलर प्रति गॅलनवरून ३.९९ डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचला आहे.
प्रवाशांवर कसा परिणाम?तिकीट दर वाढवणे, इंधन अधिभार आकारणे, अतिरिक्त सेवा (सीट अपग्रेड, अतिरिक्त सामान, प्राधान्य बोर्डिंग) महाग करणे, अमेरिकेतील विमान कंपन्या साधारणपणे स्वतंत्र इंधन अधिभार आकारत नाहीत. त्या थेट तिकिटाच्या मूळ किमतीत वाढ करतात.
या कंपन्यांनी वाढवले दरआशिया-प्रशांत महासागर प्रदेशातील काही विमान कंपन्यांनी आधीच भाडेवाढ किंवा इंधन अधिभार लागू केला आहे.कॅथे पॅसिफिक - इंधन अधिभार वाढवण्याची घोषणाएअर फ्रान्स-केएलएम - लांब पल्ल्याच्या इकॉनॉमी तिकिटात सुमारे ५० युरो वाढएअर इंडिया - युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मार्गांवर अधिभारहाँग काँग एअरलाइन्स - काही मार्गांवर इंधन अधिभार वाढफ्लायसफाएअर - अधिभार लागू आकासा एअर - आकासा एअर'ने आज १५ मार्चपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर 'फ्युएल सरचार्ज' (इंधन अधिभार) लागू करण्याची घोषणा केली आहे.
वाढत्या खर्चाच्या दबावातून निर्णय जेट इंधन हा विमान कंपन्यांच्या एकूण खर्चातील सुमारे २० ते २५ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे इंधन दरात मोठी वाढ झाल्यास कंपन्यांच्या अर्थकारणावर थेट परिणाम होतो.
काही विमान कंपन्या ‘फ्युएल हेजिंग’ या पद्धतीने आधीच ठरावीक दराने इंधन खरेदी करण्याचे करार करतात. त्यामुळे अचानक वाढलेल्या किमतीचा काही प्रमाणात परिणाम कमी होतो. मात्र, सर्व कंपन्या ही पद्धत वापरत नाहीत आणि दीर्घकाळ दर वाढले तर भाडेवाढ अपरिहार्य ठरू शकते.
मध्यपूर्वेतील काही हवाई क्षेत्रे बंद झाल्याने विमानांना पर्यायी लांब मार्गाने उड्डाण करावे लागत आहे. त्यामुळे इंधनाचा वापर वाढून संचालन खर्च अधिक वाढत आहे. विमान कंपन्या इंधनाच्या दरांवर सातत्याने लक्ष ठेवून असून, भविष्यात परिस्थितीनुसार या अधिभाराचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असेही विमान कंपन्यांनी म्हटले आहे.
Web Summary : Middle East tensions are driving up jet fuel costs, making summer air travel more expensive. Airlines are implementing fare hikes and fuel surcharges, especially on long-haul routes, due to disrupted oil supplies and increased operational expenses. Some companies are also using fuel hedging to mitigate price volatility.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण जेट ईंधन की कीमतें बढ़ रही हैं, जिससे गर्मी में हवाई यात्रा महंगी हो रही है। तेल आपूर्ति में व्यवधान और परिचालन खर्च में वृद्धि के कारण एयरलाइंस किराया वृद्धि और ईंधन अधिभार लागू कर रही हैं, खासकर लंबी दूरी के मार्गों पर। कुछ कंपनियां मूल्य अस्थिरता को कम करने के लिए ईंधन हेजिंग का भी उपयोग कर रही हैं।