शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

हमास संपल्यास गाझाला मिळेल पॅलेस्टिनी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 8:22 AM

नेतन्याहूंचे सल्लागार मार्क रेगेव यांची स्पष्टोक्ती

जेरुसलेम : “इस्रायल हमासला कोणतीही किंमत मोजून नष्ट करेल आणि यामुळे गाझातील लोकांना पॅलेस्टिनी सरकार मिळेल. राहता राहिला प्रश्न हिजबुल्लाचा. गाझातील परिस्थिती पाहून लेबनॉनच्या लोकांनी धडा घेतला पाहिजे. इस्रायलने १९६७ आणि १९७३ मध्ये दोन आघाड्यांवर युद्ध केले आणि शत्रूंचा पराभव केला होता. गरज पडल्यास यावेळीही तेच करू,” असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वरिष्ठ सल्लागार मार्क रेगेव यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

इस्रायल-हमास युद्धावर जेरुसलेमस्थित इस्रायल एशिया सेंटरने आयोजित केलेल्या चर्चासत्रात रेगेव यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. या ऑनलाइन चर्चासत्रासाठी लोकमत समूहालाही आमंत्रित करण्यात आले होते. प्रश्नांची उत्तरे देताना रेगेव म्हणाले की, इस्रायलने नेहमीच आपल्या अपयशातून धडा घेतला आहे. यावेळच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशातूनही आम्ही शिकू, पण आता मुद्दा युद्धाचा आहे. हमासला युद्धविरामाच्या रूपाने थोडा दिलासा मिळवायचा आहे, पण तसे होणार नाही. 

ते म्हणाले की, इस्रायलचे अरब जगाशी संबंध सुधारल्याने इराण अस्वस्थ झाला आहे. भारतातून युरोपमार्गे मध्यपूर्वेपर्यंत कॉरिडॉरचा प्रस्ताव आल्यानेही इराण नाराज आहे, पण हमासचा पराभव होईल आणि संबंधांचे नवे अंकुर फुलतील. कतार वगळता अरब जगतात हमाससाठी रडणारा कोणताही देश नाही. हमासविरुद्धचे हे युद्ध इस्रायलचे नाही तर शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. इस्रायलचा विजय हा खऱ्या अर्थाने गाझातील लोकांचा आणि अरब जगाचा विजय असेल. 

लेबनॉनने धडा घ्यावा...  रेगेव म्हणाले, लेबनॉनच्या लोकांना काय हवे आहे हे त्यांनी ठरवावे.   तेथील लोकांनी गाझामधील परिस्थितीकडे पाहावे आणि त्यातून धडा घ्यावा.   हिजबुल्ला आणि हमास हे जुळे भाऊ आहेत आणि जागतिक शांततेलाही धोका आहे.   आम्हाला दोन आघाड्या उघडायच्या नसल्या तरी गरज पडली तर मागे हटणार नाही.

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइन