शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सावधान! चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:44 PM

संपूर्ण चीनमध्ये अद्याप कोरोन वायरसमुळे पीडित लोकांचा आकडा २०० च्या वर गेला आहे.

पेइचिंग - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोन वायरस नावाचा आजार लोकांमध्ये पसरत असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त लोक या आजाराने ग्रस्त होत असल्याने चीन सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वायरसमुळे माणसाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. हा वायरस कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून यामध्ये काही डॉक्टरांनाही याची लागण झाल्याची माहिती चीनमधील वृत्तपत्रांनी दिली आहे. 

संपूर्ण चीनमध्ये अद्याप कोरोन वायरसमुळे पीडित लोकांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. या विषाणूचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी सांगितले आहे की, 'वुहान आणि इतर ठिकाणांवर नुकत्याच झालेल्या नवीन कोरोन वायरस न्यूमोनियाची दखल गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. सर्व सरकारी कार्यालये, दवाखाने संबंधित विभागांनी लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्राधान्य द्यायला हवं. 

हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे चीनमधून हा वायरस इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २५ जानेवारीपासून चीनमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. यावेळी अनेकांना सुट्टी असल्याने ते इतर देशात फिरण्यासाठी जातात. थायलँड आणि जपानमध्येही कोरोन वायरसची तीन प्रकरणे पुढे आली आहेत. साउथ कोरियामध्येही सोमवारी या वायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ३५ वर्षाची चीनी महिला वुहानमधून सियोलला आली होती. अमेरिकेतील विमानतळावरही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. 

वुहानमधून पसरतोय कोरोन वायरसवुहानमध्ये मागील महिन्यात हा वायरस पसरला. सरकारने याठिकाणी लोकांना आवाहन केले आहे की, ज्यांना ताप आला आहे त्यांनी त्वरीत रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. वुहानमध्ये आतापर्यंत १३६ जणांना या आजाराची लागण झाली आहे. तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वुहानमधून हा वायरस चीनच्या दुसऱ्या शहरातही पसरल्याची माहिती आहे. एका भारतीय महिला शिक्षिकेला या वायरसची लागण झाल्याची माहिती आहे. 

कोरोन वायरस म्हणजे काय?WHO नुसार कोरोन वायरस सी-फूडमुळे तसेच उंट, मांजर आणि अन्य प्राण्यांमुळे होतो. प्राण्यांमध्ये आढळणारा विषाणू मनुष्यात पसरल्यामुळे हा मानवी संसर्गाने लोकांमध्ये पसरला आहे. 

कोरोन वायरसची लक्षणे सर्दी, श्वास घेण्यास त्रास, ताप येणे अशी प्राथमिक लक्षणे असून त्याचा परिणाम न्युमोनिया आणि किडनी यांना नुकसानदायक आहे.  

टॅग्स :chinaचीनHealthआरोग्यIndiaभारत