जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:44 IST2026-03-26T08:39:07+5:302026-03-26T08:44:28+5:30

इराणकडून होर्मुज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना एन्ट्री; चीन-रशियासह 'या' ५ देशांना मोठा दिलासा

Hormuz Open for India Iran Grants Safe Passage to 5 Friendly Nations Amid Middle East Conflict | जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली

जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली

Strait of Hormuz: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजली जाणारी होर्मुजची सामुद्रधुनी इराणने शत्रू राष्ट्रांसाठी बंद केली असतानाच, भारतासाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, भारत हा इराणच्या ५ सर्वात जवळच्या मित्र देशांपैकी एक असून भारतीय जहाजांना या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

काय आहे इराणची नवी रणनीती?

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केल्यानंतर इराणने आपली भूमिका स्पष्ट केली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुजमधून जाताना चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना कोणताही अडथळा येणार नाही. "आमच्या नजरेत हा मार्ग सर्वांसाठी बंद नाही. आम्ही आमच्या मित्रांसाठी मार्ग मोकळा ठेवला आहे, पण शत्रूंना तेलाचा एक थेंबही येथून नेऊ देणार नाही," असं अब्बास अराघची म्हणाले.

तर अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांशी संबंधित जहाजांना शत्रू मानले जाणार आहे. त्यांच्यासाठी हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. ज्या देशांनी इराणविरुद्ध कोणत्याही आक्रमक कारवाईत सहभाग घेतलेला नाही, त्यांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी असेल. यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य आहे.

भारताचे मोठे यश आणि 'ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा'

मध्यपूर्वेतील संकटामुळे भारताचे १८ जहाजे होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात अडकून पडले होते. मात्र, भारताच्या यशस्वी कूटनीतीमुळे पेट्रोलियम पदार्थ घेऊन येणारी ४ जहाजे आधीच सुखरूप बाहेर पडली असून, ५ अधिक जहाजे लवकरच भारतात पोहोचतील. या कठीण काळात भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आणि ओमानच्या आखातात ५ हून अधिक आघाडीच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. एलपीजी, एलएनजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी भारतीय नौदल कवच बनून भारतीय मालवाहू जहाजांना एस्कॉर्ट करत आहे.

होर्मुज सामुद्रधुनीची महत्त्वाची का?

जगातील एकूण तेल पुरवठ्याचा सुमारे २० टक्के हिस्सा याच ३३-३९ किमी रुंद मार्गावरून जातो. आखाती देशांतून तेल निर्यातीसाठी हा एकमेव जलमार्ग आहे जो पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडतो. इराण-अमेरिका संघर्षामुळे हा मार्ग अंशतः बंद झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी पडझड आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचा उल्लेख 'दलाल' राष्ट्र असा?

दरम्यान, बुधवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने मध्य पूर्व संकटावर चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले असून, पाकिस्तानला दलाल राष्ट्र म्हटलं गेल्याचे सांगितले जात आहे.
 

Web Title : दुनिया के लिए होर्मुज जलडमरूमध्य बंद, भारत के लिए खुला: ईरानी मंत्री

Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य भारत के लिए खुला रखा है, जबकि अमेरिका और इज़राइल जैसे दुश्मनों के लिए बंद कर दिया है। भारत का 'ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा' क्षेत्रीय तनाव के बीच तेल की आपूर्ति सुनिश्चित करता है। पाकिस्तान की मध्यस्थता की भूमिका की आलोचना की गई।

Web Title : Hormuz Strait Closed for World, Open for India: Iran Minister

Web Summary : Iran keeps Hormuz Strait open for India, a key ally, while blocking access for adversaries like the US and Israel. India's 'Operation Energy Security' ensures continued oil supply amidst regional tensions. Pakistan's mediation role criticized.