हाँगकाँग : पुन्हा लोकशाहीचे वेध

By Admin | Updated: June 16, 2015 02:35 IST2015-06-16T02:35:53+5:302015-06-16T02:35:53+5:30

हाँगकाँगमध्ये नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अंब्रेला रिव्हॉल्युशनमध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. चीन सरकारने आणलेल्या नव्या निवडणूक सुधारणा

Hong Kong: Again democracy watch | हाँगकाँग : पुन्हा लोकशाहीचे वेध

हाँगकाँग : पुन्हा लोकशाहीचे वेध

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अंब्रेला रिव्हॉल्युशनमध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. चीन सरकारने आणलेल्या नव्या निवडणूक सुधारणा प्रस्तावाला हाँगकाँगवासीयांनी व विशेषत: लोकशाहीवादी आंदोलकांनी विरोध दर्शविला आहे. रविवारी व्हिक्टोरिया पार्कमध्ये हजारो नागरिकांनी पिवळ्या छत्र्या घेऊन सरकारच्या सुधारणा प्रस्तावाचा तीव्र निषेध केला.
हाँगकाँगचे प्रशासन चालविण्यासाठी उच्चपदस्थ नेते यापूर्वी सरळ बीजिंगशी जवळीक असणाऱ्या एका समितीद्वारे निवडले जात असत. आता हाँगकाँगवासीयांना मतदानाद्वारे आपले नेते निवडण्याचा अधिकार मिळणार आहे; मात्र हे उमेदवार पुन्हा तशाच समितीने छाननी केलेले असावेत, असा प्रस्ताव आहे; पण हाँगकाँगवासीयांनी याला प्रचंड विरोध केला असून, आम्हाला पूर्ण लोकशाही पद्धतीने आमचे नेतृत्व निवडायचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
१९९७ साली हाँगकाँग जेव्हा युनायटेड किंग्डमने चीनकडे सुपूर्द केले तेव्हा त्याची स्वायत्तता जपली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र हाँगकाँगवासीय कौन्सिलमधील ७० पैकी केवळ ३५ सदस्यच निवडू शकतात.
बाकीचे सदस्य कॉर्पोेरेट आणि बीजिंगशी जवळीक असणाऱ्या लॉबी, गटांकडून नेमले जातात; पण कौन्सिलमधील सर्व सदस्य सरळ मतदानाद्वारे निवडले जावेत अशी मागणी हाँगकाँगच्या नागरिकांनी केली आहे.
नऊ महिन्यांपूर्वी अंब्रेला रिव्होल्युशन या आंदोलनात नागरिकांनी चिवटपणे आपली मागणी लावून धरली होती. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Hong Kong: Again democracy watch