इस्रायलचा एअर स्ट्राईक! 'हिजबुल्लाह'चा महत्त्वाचा कमांडर हाशेम ठार, बैरुतमधील मिसाईल हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:43 IST2026-04-01T17:38:17+5:302026-04-01T17:43:18+5:30

Hajj Yusuf Ismail Hashem Death: इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर देत इस्रायलच्या लष्करी दलाने दक्षिण प्रांताच्या कमांडरला ठार मारले.  

Hezbollah commander Hajj Yusuf Ismail Hashem killed in Israeli air strike, 7 killed in missile attack in Beirut | इस्रायलचा एअर स्ट्राईक! 'हिजबुल्लाह'चा महत्त्वाचा कमांडर हाशेम ठार, बैरुतमधील मिसाईल हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू

इस्रायलचा एअर स्ट्राईक! 'हिजबुल्लाह'चा महत्त्वाचा कमांडर हाशेम ठार, बैरुतमधील मिसाईल हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू

Hajj Yusuf Ismail Hashem died in Israel Attack: लेबनानची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलच्या नौदलाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा कमांडर हाजी युसूफ इस्माइल हाशेम यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (१ एप्रिल) इस्रायली लष्करी दलाने याबद्दलचा दावा केला आहे. हिजबुल्लाहकडून याला अद्याप दुजोरा दिला गेलेला नाही. बैरुतमध्ये दुसऱ्या एका हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

इस्रायल डिफेन्स फोर्सेने एक्सवर पोस्ट करत हिजबुल्लाहचा दक्षिणेकडील कमांडर हल्ल्यात ठार झाल्याची माहिती दिली. इस्रायलच्या नौदलाने राजधानी बैरूतमध्ये हिजबुल्लाहचा कमांडर हाजी युसूफ इस्माइल हाशेम याला लक्ष्य करत हवाई हल्ला केला होता. 

इस्रायलने हाजी युसूफ इस्माइल हाशेम याला का मारले?

इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा दक्षिणेकडील कमांडर हाजी युसूफ इस्माइल हाशेम याच्यावर नस्सार, अजीज आणि बद्र या तुकड्यांची जबाबदारी होती. या तिन्ही तुकड्यांवर दक्षिण लेबनानमध्ये इस्रायलच्या लष्करावर हल्ला करण्याचे काम सोपवले आहे. त्याचबरोबर इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्याचीही जबाबदारी दिलेली आहे. 

हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख व्यक्तींपैकी एक हाशेम होता. तो ४० वर्षांपासून दहशतवादी संघटनेत काम करत होता. हाशेम यांना संघटनेची बांधणी केली आणि इस्रायलवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते, असा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे. 

हिजबुल्लाहकडून या घटनेबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, इस्रायलने बैरूतमध्ये केलेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात सात जण ठार झाले आहेत, तर २६ जण जखमी झाले आहेत. दक्षिण बैरुतमध्ये जनाह इथे हा हल्ला केला गेला होता, असे लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  

इराणने इस्रायलवर डागले १०० मिसाईल्स 

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे की, सैन्याने आणि इराणशी संबंधित गटांनी इस्रायलावर १०० पेक्षा जास्त मिसाईल्स आणि ड्रोन्स हल्ले केले आहेत. जवळपास २०० ड्रोन्स डागण्यात आल्याची माहिती दिल्याचे अल जझीराने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

इस्रायलमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. त्याचबरोबर आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरही हल्ले करण्यात आले. यात बहरीन, कुवैत येथील तळांचा समावेश आहे. कुवैतमध्ये अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर नष्ट केल्याचा दावाही इराणच्या लष्कराने केला आहे. 

Web Title : इजरायली हवाई हमले में हिजबुल्लाह कमांडर ढेर, बेरूत में 7 की मौत

Web Summary : बेरूत में इजरायली हवाई हमले में हिजबुल्लाह कमांडर हाजी युसूफ इस्माइल हाशेम मारा गया। इजरायल का दावा है कि हाशेम ने उसकी सेना पर हमलों की साजिश रची थी। एक अन्य हमले में सात लोगों की मौत हो गई, जबकि 26 घायल हो गए। ईरान ने इजरायल पर 100 से अधिक मिसाइलें दागीं।

Web Title : Israeli Airstrike Kills Hezbollah Commander; 7 Dead in Beirut Attack

Web Summary : An Israeli airstrike in Beirut killed Hezbollah commander Hajj Yusuf Ismail Hashem. Israel claims Hashem orchestrated attacks on its forces. A separate Beirut attack resulted in seven deaths and 26 injuries. Iran reportedly launched over 100 missiles at Israel.