इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:44 IST2025-08-16T18:43:14+5:302025-08-16T18:44:34+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे नुकतीच 'महाबैठक' पार पडली. ही बैठक सुरू असतानाच युक्रेनमध्ये रशियाने मोठा खेला केला आहे. यामुळे खुद्द झेलेन्स्कीही हादरले आहेत.

इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे नुकतीच 'महाबैठक' पार पडली. ही बैठक सुरू असतानाच युक्रेनमध्ये रशियाने मोठा खेला केला आहे. यामुळे खुद्द झेलेन्स्कीही हादरले आहेत. 'आपल्या सैनिकांनी युक्रेनच्या दोन गावांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे,' असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनच्या दोन गावांवर रशियाचे नियंत्रण -
रशियन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या डोनेत्स्क प्रदेशातील कोलोडियाजी गाव आणि निप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशातील व्होरोन गाव आता मॉस्कोच्या नियंत्रणाखाली आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने रात्रीच्या वेळी युक्रेनच्या हद्दीत 85 लढाऊ ड्रोन आणि एक बॅलिस्टिक मिसाइल डागले होते.
अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीपूर्वी, झेलेन्स्की म्हणाले होते, "रशियाची युद्ध रोखण्याची कुठलीही इच्छा नाही." झेलेन्स्की यांनी X वर पोस्ट करत म्हटले होते की, "ज्या दिवशी ट्रम्प-पुतिन बैठक आहे, त्या दिवशीही रशियन हत्या करत आहेत. हे बरेच काही सांगते."
झेलेन्स्की यांना बोलावले, ...तर पुतिन यांच्याशी पुन्हा बैठक -
दरम्यान, आता ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना चर्चेसाठी बोलावले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, अध्यक्ष झेलेन्स्की सोमवारी दुपारी डीसी ओव्हल ऑफिसमध्ये येत आहेत. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी पुन्हा एक बैठक होईल. 'रशिया आणि युक्रेनमधील हे धोकादायक युद्ध संपवण्याचा मार्ग म्हणजे शांतता करार. केवळ युद्धबंदी करार काम करणार नाही,' असेही ट्रम्प यांनी लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासंदर्भात ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठकीत कोणतेही एकमत होऊ शकले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.