शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून मूल रुग्णालयात टाकून ‘ती’ निघून गेली

By admin | Updated: March 13, 2016 23:10 IST

अजिबात ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून हा मला माझ्या घरात नको, अशी चिठ्ठी लिहून आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात टाकून आई निघून गेली.

लॉस एंजिल्स : अजिबात ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून हा मला माझ्या घरात नको, अशी चिठ्ठी लिहून आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात टाकून आई निघून गेली.ही घटना पश्चिम जॉर्डनच्या उताह येथील जॉर्डन व्हॅली मेडिकल सेंटरमध्ये गेल्या महिन्यात घडली. या आईवर मुलाशी गैरवर्तन करणे आणि त्याला टाकून जाण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाला तर तिला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. या महिलेने मुलाच्या पाठीवरील पिशवीत मावतील एवढेच कपडे त्याच्यासोबत दिले होते व चिठ्ठी लिहिली. तीत म्हटले होते की, ‘हा मुलगा उद्धट आणि न ऐकणारा आहे. मला तो माझ्या घरात अजिबात नको आहे. मी वाईट आई आहे, असे मला अजिबात वाटत नाही. मला त्याने फारच जेरीस आणले आहे,’ असे या महिलेने म्हटल्याचे ‘फॉक्स थर्टीन’ ने वृत्त दिले. पालक जेव्हा अशा परिस्थितीला तोंड देतात तेव्हा त्यांच्या मदतीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत; परंतु या महिलेने जे काही केले ते मान्य न होणारे आहे, असे साल्ट लेक सिटी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी सिम गिल यांनी म्हटले. तुम्ही जेव्हा मुलांशी वाईट वागता, त्यांना टाकून देता तेव्हा त्यांना शारीरिक किंवा मानसिक दहशत निर्माण होते व स्वत:चे संरक्षण करू न शकणाऱ्या मुलांचा विचार करता ही बाब मोठ्याच काळजीची आहे, असे गिल म्हणाल्याचे वृत्त आहे. तो मला नावाने हाका मारायचा. तो सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची पँट खाली ओढायचा, असे तिने सांगितले.या मुलाला संगोपन केंद्रात ठेवण्यात आल्यापासून त्याची आई आणि वडील परत एकत्र आले आहेत. त्याची आई त्याला आता भेटायलाही येते. ती म्हणाली, ‘तो परत घरी यावा असे मला वाटते आणि त्याचीही तशी इच्छा आहे.’