शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

हमासने केलेले हल्ले ९/११ पेक्षाही भयावह; बायडेन यांची इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 06:12 IST

हमासने केलेल्या सैतानी कृत्यांना पायबंद बसायलाच हवा. त्यामुळे इस्रायलला स्वत:च्या संरक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी अमेरिका पुरविणार आहे.

वॉशिंग्टन : अल् कायदाने अमेरिकेवर केलेल्या ९/११च्या हल्ल्यांपेक्षा हमासने इस्रायलवर केलेला हल्ला अधिक भीषण आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, हमासविरुद्धच्या संघर्षात अमेरिका इस्रायलच्या बाजूने ठाम उभी आहे.पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेने गेल्या शनिवारी इस्रायलवर हल्ले चढविले. त्याला इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले. या संघर्षात आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यात २७ अमेरिकी नागरिकांचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर बायडेन म्हणाले की, अल् कायद्याने जेवढे क्रौर्य दाखविले होते त्यापेक्षाही भयंकर पातळी हमासने गाठली आहे. हमासने केलेल्या सैतानी कृत्यांना पायबंद बसायलाच हवा. त्यामुळे इस्रायलला स्वत:च्या संरक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी अमेरिका पुरविणार आहे. इस्रायलला पाठिंबा देऊन अमेरिकेने कोणतीही चूक केलेली नाही. पॅलेस्टाइनमधील बहुतांश लोकांना हमास या दहशतवादी संघटनेशी काहीही देणेघेणे नाही हे सर्वांना माहिती आहे. मात्र हमासला तिने केलेल्या गैरकृत्यांची शिक्षा मिळणे आवश्यक आहे, असेही बायडेन यांनी नमूद केले.

‘दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूंवरील भीषण अत्याचार’ 

  • हमासने इस्रायलमध्ये नुकतेच केलेले क्रूर हल्ले हे दुसऱ्या महायुद्धात युरोपमध्ये झालेल्या शिरकाणानंतर ज्यूंवर झालेले सर्वात प्राणघातक हल्ले आहेत असे उद्गार अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जेमी रस्किन यांनी काढले.
  • हमासला पूर्णपणे नेस्तनाबूद करण्यासाठी अत्यंत कठोर कारवाई करायला हवी. त्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या व्यक्तींसह सर्वांचेच सहकार्य लागणार आहे, असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनीही दिला पाठिंबाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हमासविरुद्धच्या संघर्षात माझा इस्रायल व त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इस्रायलविरोधी वक्तव्य केले होते. हमासचा हल्ला हे इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे ते म्हणाले होते. 

‘भीषण परिणाम होतील’ इस्रायलने गाझा भागावर सुरू ठेवलेले हल्ले त्वरित थांबवावेत, नाहीतर इस्रायलला त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी दिला आहे. 

एअर इंडियाची विमानसेवा बुधवारपर्यंत स्थगितएअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे जाणाऱ्या आपल्या विमानसेवेच्या स्थगितीची मुदत येत्या बुधवारपर्यंत वाढविली आहे. दर आठवड्याला एअर इंडियाच्या विमानाच्या भारतातून तेल अवीवला पाच फेऱ्या होत असत. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षJoe Bidenज्यो बायडन