शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

महान गोल्फपटू टायगर वूड्‌स कार अपघातात गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 00:19 IST

अनियंत्रित भरधाव कार दुभाजकावर आदळली

लॉस एंजिलिस : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. वूड्स यांच्या कारला मंगळवारी लॉस एंजिलिसमध्ये अपघात झाला. यात टायगर वुड्स यांच्या पायाला इजा झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, असून जखमी पायावर शस्त्रक्रिया   कर ण्यात आल्याची माहिती लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे.

लॉस एंजिलिसमधील रोलिंग हिल्स एस्टेट्स आणि रँचो पालोस वेरिड्सच्या दरम्यान सकाळी ७.१२ वाजता ही अपघाताची घटना घडली. वक्राकार असलेल्या ब्लॅकहॉर्स रोडवरून जात असताना टायगर वूड्स यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर दुभाजकावर आदळली आणि पलटली.  कारमध्ये वूड्स एकटेच होते. त्यांना विंडोशिल्डमधून बाहेर काढण्यात आले.

अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असून, वूड्स यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या शरीरातून अल्कोहोल किंवा इतर अंमली द्रव्याचा गंध येत नव्हता. कारचा वेग किती होता, याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. वूड्स यांच्या अपघातग्रस्त कारची दृश्येही व्हायरल झाली आहेत. या दृश्यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झालेला असून, एअरबॅगही दिसत आहेत. हेलिकॉप्टरमधून हे छायाचित्र घेण्यात आले आहे. 

उजव्या पायावर  यशस्वी शस्त्रक्रिया 

जखमी वूड्‌सच्या उजव्या पायावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. वूड्‌स फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान वूड्‌सच्या पायात रॉड्‌स, स्क्रू आणि पिन्स टाकण्यात आल्या. दीर्घ शस्त्रक्रियेनंतर वूड्‌स शुद्धीवर आले असून ते उपचारास प्रतिसाद देत आहेत. हार्बर वैद्यकीय केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिश महाजन यांनी वूड्‌स यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून पोटरीच्या हाडात रॉड टाकण्यात आल्याचे सांगितले. पायाच्या आणि घोट्याच्या जखमांसाठी स्क्रू तसेच पिन्स टाकण्यात आल्या.

टॅग्स :Accidentअपघात