शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लख्वीच्या जामिनाला सरकारचे आव्हान

By admin | Updated: January 2, 2015 02:29 IST

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याला जामीन देण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाक सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याला जामीन देण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाक सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. लख्वी याची सुटका झाल्यास कायदा व सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा सरकारचा दावा आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून लख्वीला जामीन दिला आहे. लख्वी बाहेर आल्यास कायदा व सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे सरकारच्या याचिकेत म्हटले आहे. पाक सरकारने सार्वजनिक कायदा व सुरक्षा कायम ठेवण्यासाठी लख्वीला अटक केली होती; पण हा दावा दुर्बळ असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निकाल लावून धरणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आल्यानंतर अब्बासी बोलत होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी लख्वी याला सशर्त जामीन मंजूर केला होता. लख्वीने १० लाख रुपयांची जमानत ठेवावी, तसेच मुंबई हल्ल्याच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावे, असे न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सरकारने दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर अपहरणाचा खटला दाखल केला होता. लख्वीला (५४) १८ डिसेंबर रोजी हा जामीन मिळाला होता. त्यानंतर पुन्हा झालेल्या अटकेला त्याने आव्हान दिले. सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश रद्द केला, त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ८ जानेवारी रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाची हिवाळी सुटी संपणार असून, त्यानंतर लख्वीच्या जामिनाला आव्हान देऊ, असे सरकारने म्हटले होते. (वृत्तसंस्था)४२००८ सालातील मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याला आज पुन्हा रावळपिंडी तुरुंगात जावे लागले. लख्वीवर सरकारने दाखल केलेल्या अपहरणाच्या प्रकरणात न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. लख्वीचा दोन दिवसांचा रिमांड संपल्यानंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.