शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 22:46 IST

या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिकच बिघडले आहेत. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच आता, अमेरिकेने भारताला मोठी मदत करणार निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. अमेरिकन परराष्ट्र विभागाने भारताला इंडो-पॅसिफिक मॅरीटाइम डोमेन अवेयरनेस आणि संबंधित उपकरणांच्या संभाव्य परदेशी लष्करी विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. याची किंमत अंदाजे १३१ मिलियन डॉलर एवढी आहे. या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल.

अमेरिका-भारताचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल -आधिकृत निवेदनानुसार, संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने या संभाव्य विक्रिसंदर्भात माहिती देताना आवश्यक ते सर्टिफिकेटही प्रदान केले आहे. भारत सरकारने सी-व्हिजन सॉफ्टवेअर, तांत्रिक सहकार्य फील्ड टीम (TAFT) प्रशिक्षणाला मान्यता दिली आहे. रिमोट सॉफ्टवेअर आणि विश्लेषणात्मक समर्थन, सी-व्हिजन डॉक्युमेंटेशनची उपलब्धता आणि बरेच गोष्टींच्या खरेदीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, “या विक्रीमुळे अमेरिका-भारताचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय, इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशात राजकीय स्थिरता, शांतता आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनेही महत्वाची आहे.

भारत आणि पाकिस्तानने तणाव कमी करावा : अमेरिकेचे आवाहन - दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत स्वतंत्रपणे फोनवरून संवाद साधला आणि दोन्ही देशांना कोणताही तणावापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIndiaभारत