५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 02:31 PM2020-06-03T14:31:23+5:302020-06-03T14:53:04+5:30

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हा उल्कापिंड ६ जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग इतका मोठा हा उल्का आहे.

Giant asteroid ready to enter in earths orbit alert from NASA pnm | ५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

Next

वॉश्गिंटन – एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अंतराळ संस्था नासाने एका अशा उल्कापिंडाचा शोध घेतला आहे. जो पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. याबाबत नासाने अलर्ट जारी केला आहे. जवळपास अर्धा किमी उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा वेग ५.२ किमी प्रति सेंकद इतका आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हा उल्कापिंड ६ जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग इतका मोठा हा उल्का आहे. नासाने या उल्काला रॉक १६३३४८(२००२ NH४) असं नाव दिलं आहे. ६ जून रोजी हा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. याची लांबी २५० ते ५७० मीटर इतकी आहे तर १३५ मीचर रुंद आहे. हा उल्का सूर्याच्या नजीकहून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल.

मागील २१ मे रोजी १.५ किमी आकाराचा उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून पुढे गेला. वैज्ञानिकांचे म्हणणं आहे की, हा उल्कापिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता कमी आहे. पण कधीकधी गुरुत्वाकर्षणामुळे शेवटच्या क्षणीही हा उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करु शकतो त्यावर नजर ठेवावी लागणार आहे. नासाच्या माहितीनुसार  रॉक १६३३४८(२००२ NH४) उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून रविवारी सकाळी ८.२० मिनिटांनी जाईल. पृथ्वीच्या जवळून यानंतर कोणताही उल्कापिंड यानंतर २०२४ मध्येच जाईल. सध्या याचा वेग ५.२ किमी प्रति सेकंद इतका आहे म्हणजे ११ हजार २०० किमी प्रति तास वेगाने येत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Nisarga Live Updates: निसर्ग चक्रीवादळ मुंबई, ठाण्याच्या दिशेनं; अनेक भागांत झाडं कोसळल्यानं मोठं नुकसान

निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज

भारताच्या पंतप्रधानांसाठी बनवलेलं खास ‘सुपर प्लेन’ उड्डाणासाठी सज्ज; कसं असेल सुरक्षा कवच?

 हजारोंच्या गर्दीतही कोरोना संक्रमित रुग्ण शोधणार; भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला ‘असा’ अविष्कार!

कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला!

Read in English

Web Title: Giant asteroid ready to enter in earths orbit alert from NASA pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.