Coronavirus: कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला!

Published: June 3, 2020 09:41 AM2020-06-03T09:41:23+5:302020-06-03T09:45:16+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगात ६४ लाखाहून अधिक लोकांना जाळ्यात ओढलं आहे. तर आतापर्यंत ३ लाख ८० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस आजारावर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, अद्याप कोरोनावर लस उपलब्ध झाली नाही, परंतु काही वैज्ञानिक कोरोना लसीच्या ट्रायल चाचणीपर्यंत पोहचले आहेत.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यात जगातील बहुतांश देश गुंतले असतानाच रशियात रक्त पिणाऱ्या किड्यांनी हल्ला केला आहे. हा किडा चावल्याने लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. पण औषध आणि लसीच्या अभावाचा सामना रुग्णांना करावा लागत आहे.

रशियाच्या सरकारी आकड्यानुसार हे किडे जवळपास ४२८ टक्क्यांनी वाढले आहेत. रशियन मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

रशियाच्या सायबेरिया प्रदेशात या कीटकांची संख्या खूप वाढली आहे. हे कीटक लहान कोळी (अ‍ॅराकिनिड) सारखे दिसतात. पण हे उत्परिवर्तित आहेत. त्यामुळे ते अधिक धोकादायक सिद्ध होत आहेत.

सायबेरियातील रुग्णालयात या किडीच्या चाव्याव्दारे, औषधे व लसीचा तुटवडा नसल्याने इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. डेली मेल वेबसाइटने ही माहिती दिली आहे.

या किड्याच्या प्रजातीमुळे २०१५ मध्ये रशियात एन्सेफलायटीस पसरला होता. यामुळे सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या कीटकांमुळे या भागात लाइम रोग पसरला होता.

या किड्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणार्‍या लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याचीही भीती आहे. कारण कोरोना विषाणूमुळे बर्‍याच रुग्णालयांची व्यवस्था बदलली आहे.

मध्य रशियाच्या क्रास्नोयार्स्कमध्ये या किड्याच्या चाव्यामुळे ८ हजार २१५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ हजार १२५ मुले आहेत. क्रास्नोयार्स्कमध्ये, प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये २१४ टिक बाइट्स प्रकरणे आहेत. तर सुरक्षित आणि सामान्य संख्या ०.५ आहे.

हे किडे मेंदू, हाडे सांधे, हृदय आणि मज्जासंस्थेवर लाइम रोग, एन्सेफलायटीस द्वारे आक्रमण करतात. या किड्यामध्ये दोन सामान्य रशियन किटकांचे उत्परिवर्तन आहे. हे रशियन किडे टाइगा टिक आणि फार ईस्टर्न टिकचा मिश्रित आणि धोकादायक प्रकार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!