इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:59 IST2025-07-04T10:59:18+5:302025-07-04T10:59:32+5:30
Iran Vs Israel War: सौदीची विमाने इराणने इस्रायलवर हल्ल्यासाठी पाठविलेली ड्रोन पाडत होती. सौदीची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर इराक आणि जॉर्डनच्या आकाशात उडत होती.

इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
गेल्या महिन्यात १२ दिवस चाललेल्या इस्रायल -इराण युद्धात मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायलने हल्ला करताच इराणच्या मदतीला एकही मुस्लिम देश आला नव्हता. उलट सौदी अरेबियाने इराणच्या पाठीत खंजीर खुपसत इस्रायलच्या सुरक्षेसाठी लढाऊ विमाने पाठविली होती. कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदीने इराणवरील हल्ल्याचा सार्वजनिकरित्या निषेध व्यक्त करत इराणविरोधातच गुप्त मोहिम राबविली होती.
सौदीची विमाने इराणने इस्रायलवर हल्ल्यासाठी पाठविलेली ड्रोन पाडत होती. सौदीची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर इराक आणि जॉर्डनच्या आकाशात उडत होती. या देशांच्या आकाशातून जाणाऱ्या मानव रहित ड्रोन पाडण्यात येत होते, असा आरोप इराणी मीडियाने केला आहे.
काही ड्रोन इस्रायलच्या दिशेने या दोन देशांच्या आकाशातून जात होते. तेव्हा सौदीने त्यांना रोखल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर सौदीने अद्याप आपण या मोहिमेत होतो किंवा नाही याबाबत अवाक्षरही काढलेले नाहीय. परंतू, सौदी आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीमुळे सौदीने त्यांच्या सांगण्यावरून ही मदत देऊ केली होती, असे सांगितले जात आहे.
इराणविरुद्ध इस्रायली कारवाईचा निषेध करणाऱ्या डझनभर मुस्लिम बहुल देशांपैकी सौदी अरेबिया एक होता. इराणी भूभागावर कोणत्याही हल्ल्यासाठी सौदीचे हवाई क्षेत्र खुले केले जाणार नाही असेही सौदीने म्हटले होते. परंतु नंतर सौदी अरेबियाने जॉर्डन, ब्रिटन, फ्रान्स यांच्यासोबत इराणी ड्रोनना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या मोहिमेत सामील झाले आणि त्याचे नेतृत्व अमेरिकन सेंट्रल कमांडने केले. यापैकी एकट्या जॉर्डनने आपण इराणी ड्रोन, मिसाईल रोखल्याचे जाहीर केले आहे. कारण ते त्यांचे आकाश होते. परंतू, या आकाशात या चार देशांची यंत्रणा उडत होती.