Pakistan Suicide Car Bomb: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण तणावाचे आहे. असे असले तरीही युद्धविरामानंतर दोन देशांच्या सीमेवर काही अंशी शांतता प्रस्थापित झाली आहे. पण पाकिस्तानात मात्र अंतर्गत स्तरावर विविध लज्जास्पद प्रकार घडतच आहेत. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळच्या वेळेत पाकिस्तानमध्ये एक आत्मघातकी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानसारख्या दहशतावादाला पोसणाऱ्या देशात असे हल्ले आता जगाला नवीन राहिलेले नाहीत. पण धक्कादायक बाब म्हणजे, हा आत्मघातकी हल्ला चक्क एका शाळेच्या बसवर करण्यात आला. एका शाळेच्या बसला या आत्मघातकी बॉम्बरने लक्ष्य केले आणि त्यात चार लहान मुलांचा करण्यात आले आहे, ज्यामध्ये चार मुलांचा मृत्यू झाला.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
या हल्ल्याबाबत असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एक आत्मघातकी हल्लेखोरांची कार शाळेच्या बसला धडकली. नैऋत्य पाकिस्तानात बुधवारी सकाळी ही घटना घडली. स्थानिक उपायुक्त यासिर इकबाल यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, हा हल्ला बलचिस्तानच्या खुझदार जिल्ह्यात झाला. सकाळी शाळकरी मुलांना घेऊन स्कूल बस जात असताना हा हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. पण आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच अनेक शाळकरी मुले जखमी झाली आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
हल्ला कुणी केला?
कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही. पण या हल्ला बलोच सेपरेटिस्ट ग्रुपकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण याआधी या ग्रुपने या प्रांतातील सुरक्षा अधिकारी आणि नागरिकांना लक्ष्य केले आहे.
पाकिस्तानचे मंत्री म्हणतात...
पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. लहान मुलांना मृत्युवर त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. हे हल्लेखोर निर्लज्ज असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच, हल्लेखोरांविरोधात कोणतीही दया-माया दाखवली जाणार नाही असेही सांगितले आहे.