शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

विमानात ‘अल्लाह-हु-अकबर’ ओरडणा-या प्रवाशाची जेलमध्ये रवानगी

By admin | Updated: July 5, 2016 10:03 IST

ब्रिटनला जाणा-या विमानात ‘अल्लाह-हु-अकबर’चा नारा देत तसंच ‘बूम’ ‘बूम’ ओरडून प्रवाशांना घाबरवल्याबद्द्ल पाकिस्तानी वंशाच्या नागरिकाला दहा आठवड्यांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. 05 - ब्रिटनला जाणा-या विमानात ‘अल्लाह-हु-अकबर’चा नारा देत तसंच ‘बूम’ ‘बूम’ ओरडून प्रवाशांना घाबरवल्याबद्द्ल पाकिस्तानी वंशाच्या नागरिकाला दहा आठवड्यांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
 
दुबईहून बर्मिंघमला जाणा-या इमिरेट्सच्या बोईंग 777 विमानात प्रवास करताना शहराज सरवर या व्यक्तीने अचानक ओरडण्यास सुरुवात केली. शहराज सरवरच्या अशा वागण्याने विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले होते. काही प्रवाशांना तर रडूदेखील आलं होतं. 
 
'विमानात प्रवासादरम्यान प्रचंड गोंधळ होता. काही प्रवासी तर खुप घाबरले होते. आरोपीने जोर जोरात  ‘अल्लाह-हु-अकबर’ ओरडण्यास सुरुवात केली. ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला. जेव्हा विमान खाली उतरलं तेव्हादेखील 'बूम' असं तो जोरात ओरडला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं, त्यांनी शहराज सरवरला अटक केली', अशी माहिती सरकारी वकिल अॅलेक्स वॉरेन यांनी बर्मिंघम न्यायालयात दिली आहे. 
 
न्यायाधीशांनी विमानात अशा प्रकारे प्रवाशांना घाबरवण्याच्या आणि रडवण्याच्या घटनेला गंभीरतेने घेतल आहे. शहराज सरवरला दहा आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून न्यायालयाकडे दुसरा पर्याय नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. 
 
शहराज सरवरच्या वकिलांनी बचाव करत त्याने जे केलं तो मुर्खपणा होता, पण तो पाकिस्तानमधील आपल्या आजीचा अंत्यसंस्कार करुन परतत होता. तो दुखी: होता असं न्यायालयात सांगितलं आहे. न्यायाधीशांनी मात्र शहराज सरवरची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर पुढील 12 महिने देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.